ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ ‘भाऊ‎ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ ‘भाऊ‎ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

सोलापूर‎ : ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय‎ सामाजिक‎ संस्थेच्या वतीने‎ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ साहेब‎ तसेच‎ प्रभाग क्र.‎ २२ चे‎ भाजप नगरसेवक किसन (भाऊ) जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या‎ ‘भाऊ‎ चषक’ भव्य‎ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे‎ उद्घाटन बुधवारी नेहरूनगर‎ येथील‎ शासकीय‎ क्रीडांगणावर महापौर विनायक कोंडयाल व सभागृह नेते‎ नरेंद्र काळे‎ यांच्या शुभहस्ते उत्साहात झाले.‎ यावेळी नगरसेवक‎ किसन जाधव,‎ नगरसेविका सौ.‎ चैत्राली‎ शिवराज गायकवाड, सामाजिक‎ कार्यकर्ते शिवराज‎ गायकवाड, चेतन‎ नागेश‎ (अण्णा)‎ गायकवाड, प्रेम गायकवाड व‎ कार्तिक जाधव यांची‎ प्रमुख‎ उपस्थिती‎ होती. उपस्थित मान्यवरांचे‎ स्वागत व‎ सत्कार‎ नगरसेवक किसन‎ जाधव यांच्या हस्ते‎ करण्यात आला याप्रसंगी महापौर विनायक कोंडयाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरसेवक‎ किसनभाऊ‎ जाधव यांना वाढदिवसानिमित्त‎ शुभेच्छा‎ देत, अशा स्पर्धांमुळे‎ युवकांना‎ आपली गुणवत्ता‎ सिद्ध करण्यासाठी‎ सक्षम‎ व्यासपीठ उपलब्ध‎ होत‎ असल्याचे सांगितले.‎ ग्रामीण‎ व शहरी‎ भागातील प्रतिभावान‎ खेळाडूंना‎ प्रोत्साहन देण्यासाठी‎ अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद‎ केले. सभागृह नेते नरेंद्र‎ काळे यांनीही‎ स्पर्धेचे कौतुक करत युवकांनी‎ क्रीडाक्षेत्रात मोठी‎ भरारी घ्यावी,‎ अशी अपेक्षा‎ व्यक्त‎ केली. नगरसेवक किसन‎ जाधव म्हणाले,‎ ‘भाऊ‎ चषक’ टेनिस बॉल‎ क्रिकेट स्पर्धेचा‎ उद्देश केवळ सामने‎ आयोजित‎ करणे नसून,‎ टेनिस‎ क्रिकेटला‎ जागतिक‎ दर्जाची ओळख मिळावी आणि येथील खेळाडूंना‎ मोठ्या व्यासपीठापर्यंत‎ पोहोचण्याची संधी‎ मिळावी, यासाठीचा हा‎ छोटासा प्रयत्न‎ आहे. २२‎ ते २५ जुलैदरम्यान‎ होणाऱ्या‎ या स्पर्धेत‎ १६‎ संघ आणि सुमारे‎ २५०‎ खेळाडू‎ सहभागी होत आहेत.‎ प्रथम‎ पारितोषिक रु‎ ४६,००० व ट्रॉफी, द्वितीय रु‎ २३,००० व ट्रॉफी,‎ तृतीय‎ रु‎ ११,०००‎ व ट्रॉफी देण्यात‎ येणार‎ असून,‎ मॅन ऑफ द‎ मॅच, मॅन‎ ऑफ‎ द‎ सिरीज व मालिकावीर असे‎ वैयक्तिक‎ पुरस्कारही‎ प्रदान करण्यात येणार आहेत.‎ स्पर्धेच्या यशस्वी‎ आयोजनासाठी‎ ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक‎ संस्थेचे पदाधिकारी व‎ सदस्य परिश्रम‎ घेत असून,‎ चार दिवस चालणाऱ्या या‎ स्पर्धेत रंगतदार सामने‎ क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण‎ ठरणार आहेत.