ईद-ए-मिलादुन्नबी जुलूसाच्या अध्यक्षपदी समीर शेख

ईद-ए-मिलादुन्नबी जुलूसाच्या अध्यक्षपदी समीर शेख

सोलापूर : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून दरवर्षी विजापूर वेस येथून भव्य जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस काढण्यात येतो. यंदाच्या जुलूसाच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, युथ प्राईड ग्रुपचे संस्थापक समीर शेख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यंदाचा जुलूस अधिक शिस्तबद्ध, भव्य आणि उत्साहपूर्ण करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या आहेत. उपाध्यक्षपदी पीर अहमद शेख, ताजुद्दीन हत्तुरे आणि सईद नाईकवाडी, तर कार्याध्यक्षपदी राजू हुंडेकरी यांची निवड झाली. जनरल सेक्रेटरीपदी राजू कुरेशी, तर सेक्रेटरीपदी शफिक रजबरे, आसिफ शेतसंधी आणि कलीम तुळजापुरे यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी इस्माईल शेख, तर सहखजिनदारपदी याकूब एम.आर. यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

जुलूसाच्या नियोजनासाठी मिरवणूक प्रमुख म्हणून सोहेल कुरेशी यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी कादरभागा नगरी, सलीम पामा आणि तौसिफ शेख यांची निवड झाली.

मोहल्ला व वाहन सजावटीची धुरा अश्फाक बागवान यांच्यावर सोपविण्यात आली असून, सदस्य म्हणून मुन्ना वाडसंगकर, बाबा बेडेपिर आणि अयाज दिना यांची निवड करण्यात आली.

या निवडीवेळी विश्वस्त यू. एन. बेरिया, वाहिद नदाफ, आरिफ शेख, मतीन बागवान, शकील मौलवी, हाजी तौफिक हत्तुरे, अखलाक दिना, जमीर पुढारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूसाची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने, भव्यता, शिस्त आणि एकतेचा संदेश देणारा जुलूस सोलापूरच्या रस्त्यांवर पाहायला मिळणार, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.