सोलापूर : हार्ड कोअर पूर्णवेळ भाजप कार्यकर्ता असलेले प्रमोद कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला. निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल चाळकऱ्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नियमितपणे ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतात. त्यात ते देशभरातील विविध विषयांवर नागरिकांना संबोधित करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी भाजपातर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आमदार देवेंद्र कोठे हे नियमितपणे या कार्यक्रमाला मतदारसंघात हजेरी लावतात. या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमावेळी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे हे नेहमीच त्यांच्या घरी, कार्यालयास भेट देतात. रविवारीही आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपाचे एन. जी. मिल चाळ येथील रहिवासी बूथ क्रमांक ७ चे बूथ प्रमुख आणि पूर्णवेळ भाजपा कार्यकर्ता प्रमोद कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच एन. जी. मिल चाळीतील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
मन की बात कार्यक्रमानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी एन. जी. मिल चाळीतील रवींद्र तळीखेडे, चाळीचे सचिव भारत दुर्गे, शाहू सलगर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चहापान केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र तळीखडे, दीपक राजगे, श्रीनिवास तुम्मा, रवींद्र मेरगु, यश गोडसे, शशिकला कदम, दिपाली भिसे, अलका गोडसे, आकाश आहेरवाडी, अंबादास संजीव, सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट १
आमदारांच्या अचानक आगमनामुळे भारावला कार्यकर्ता
आमदार देवेंद्र कोठे हे ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या घरी येत आहेत असा निरोप अचानक मिळताच भाजपचे निष्ठावंत पूर्णवेळ कार्यकर्ते प्रमोद कदम भारावून गेले. त्यांनी अतिशय आनंदाने आमदार देवेंद्र कोठे आणि सहकारी भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
चौकट २
नगरसेवक झाले आवाक
आमदार देवेंद्र कोठे ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यासाठी शहर मध्य मतदारसंघातील कोणत्याही बूथवर अचानक भेट देतात. रविवारीदेखील आ. कोठे यांनी एन. जी. मिल चाळीतील बूथवर आल्याचे कळताच परिसरातील नगरसेवक आवाक झाले. मात्र बूथ क्रमांक ७ वर ‘मन की बात’ च्या कार्यक्रमाचे झालेले सुयोग्य नियोजन पाहून आमदार देवेंद्र कोठे यांनी संबंधितांचे कौतुक केले.

