बी-२‎ हटविण्याचा निर्णय‎ सोलापूरच्या‎ अभिमानात‎ मानाचा तुरा

बी-२‎ हटविण्याचा निर्णय‎ सोलापूरच्या‎ अभिमानात‎ मानाचा तुरा

सोलापूर‎ – शहरातील‎ जुन्या‎ कामगार चाळींवरील‎ बी-२‎ निर्बंध हटविण्याचा‎ ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ सोलापूर शहर‎ मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे‎ आमदार देवेंद्र दादा‎ कोठे‎ यांचा‎ सत्कार‎ करण्यात आला.‎ यावेळी सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे भाजपा‎ नगरसेवक‎ किसन जाधव यांनी‎ आमदार‎ देवेंद्र दादा‎ कोठे‎ यांचा शाल‎ व‎ पुष्पगुच्छ‎ देऊन‎ सन्मान‎ करत त्यांच्या‎ विकासाभिमुख नेतृत्वाचा‎ गौरव केला.‎ याप्रसंगी‎ अक्कलकोट विधानसभा‎ मतदारसंघाचे पाणीदार आमदार‎ सचिन‎ दादा‎ कल्याणशेट्टी, महापौर‎ विनायक‎ कोंड्याल, स्वीकृत‎ नगरसेवक‎ मनीष‎ केत,‎ माजी‎ नगरसेवक‎ जगदीश‎ पाटील, लालू‎ खंडेलवाल, समर्थ नरवडे,‎ वसंत‎ हेमगड्डी,‎ फारुख बागवान, सचिन जाधव,‎ माणिक‎ कांबळे‎ तसेच‎ ईच्छा‎ भगवंताची परिवारातील पदाधिकारी‎ व‎ सदस्य‎ मोठ्या‎ संख्येने उपस्थित‎ होते.‎

राज्याचे‎ महसूल‎ मंत्री चंद्रशेखर‎ बावनकुळे यांनी‎ विधिमंडळात‎ बी-२‎ निर्बंध‎ हटविण्याची अधिकृत‎ घोषणा‎ केली. मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि‎ पालकमंत्री‎ जयकुमार भाऊ‎ गोरे‎ यांच्या‎ विशेष सहकार्याने हा‎ निर्णय शक्य झाला.‎ अनेक दशकांपासून‎ प्रलंबित असलेला‎ हा प्रश्न मार्गी‎ लावण्यासाठी आमदार देवेंद्र दादा‎ कोठे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.‎ या‎ निर्णयामुळे बी-२ निर्बंधाखालील कामगार चाळींमधील सुमारे नऊ‎ हजार‎ कुटुंबांना घराचा कायदेशीर‎ मालकी‎ हक्क‎ मिळण्याचा‎ मार्ग मोकळा झाला‎ असून,‎ खरेदी-विक्री,‎ बँक‎ कर्ज,‎ वारस‎ नोंद, पुनर्विकास‎ व‎ बांधकाम‎ परवानग्यांतील अडचणी‎ दूर होणार आहेत.‎

यावेळी‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव म्हणाले, कामगारांच्या‎ हक्काच्या‎ घराचा प्रश्न‎ अनेक वर्षे प्रलंबित‎ होता. आमदार‎ देवेंद्र‎ दादा‎ कोठे यांनी चिकाटी, अभ्यासपूर्ण‎ मांडणी‎ आणि‎ प्रभावी पाठपुराव्याच्या‎ जोरावर‎ हा‎ ऐतिहासिक‎ निर्णय घडवून‎ आणला. बी-२‎ निर्बंध‎ हटविण्याचा‎ निर्णय‎ सोलापूरच्या‎ अभिमानात मानाचा तुरा‎ रोवणारा‎ आहे.‎ आता सोलापूरचा‎ विकास‎ थांबणार‎ नाही, कारण‎ विकासाची धुरा सक्षम नेतृत्वाच्या रूपाने‎ आमदार‎ देवेंद्र‎ दादा कोठे यांनी‎ हाती घेतली‎ आहे. अखेर‎ स्वर्गीय विष्णुपंत‎ तात्यासाहेब‎ कोठे‎ यांचे स्वप्न आमदार देवेंद्र‎ दादा कोठे यांनी‎ पूर्ण केला असे मनोगत यावेळी‎ किसन जाधव यांनी व्यक्त‎ केलं.‎

सत्काराला उत्तर देताना‎ आमदार‎ देवेंद्र कोठे म्हणाले, बी-२चा‎ प्रश्न हा‎ हजारो‎ कामगार कुटुंबांच्या‎ न्यायाचा आणि‎ हक्काचा विषय होता.‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस, महसूल‎ मंत्री‎ चंद्रशेखर बावनकुळे‎ आणि‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे‎ यांच्या‎ सहकार्यामुळे हा ऐतिहासिक‎ निर्णय शक्य झाला.‎ सोलापूरच्या सर्वांगीण‎ विकासासाठी, रोजगारनिर्मिती,‎ आयटी‎ पार्क,‎ उद्योगवाढ,‎ पाणी, रस्ते‎ आणि‎ इतर‎ पायाभूत‎ सुविधांसाठी माझा पाठपुरावा‎ यापुढेही‎ अधिक जोमाने सुरू राहील.‎ सोलापूरला विकासाच्या नव्या‎ उंचीवर नेण्यासाठी मी‎ सदैव‎ कटिबद्ध‎ आहे.‎

यावेळी उपस्थितांनी बी-२ निर्बंध‎ हटविण्याचा‎ निर्णय हा‎ सोलापूरच्या कामगार वर्गासाठी ऐतिहासिक ठरल्याची भावना व्यक्त‎ करत‎ आमदार‎ देवेंद्र‎ दादा‎ कोठे‎ यांच्या नेतृत्वाखाली‎ शहराच्या‎ विकासाला अधिक वेग‎ मिळेल,‎ असा विश्वास‎ किसन जाधव यांनी‎ व्यक्त केला.‎