सोलापूर – सातारा येथे रविवारी पार पडलेल्या अत्यंत अवघड व जगप्रसिद्ध अशी 21 किलोमीटरची सातारा हिल हाफ मॅरेथॉन डॉ. शुभांगी वाघचवरे यांनी दोन तास 52 मिनिटात पूर्ण केली.
याचबरोबर त्या सोलापुरातील पहिल्या महिला धावपटू ठरल्या ज्यांनी सलग पाच वेळा म्हणजेच 2019, 2023, 2024, 2025, 2026 साली सातारा हिल हाफ मॅरेथॉन पूर्ण केली.
यासाठी त्यांना विशेष असे “फाईव्ह स्टार“ मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी डाॅ. शुभांगी म्हणाल्या की मॅरेथान रनिंग साठी मला घरातूनच प्रोत्साहन मिळते. पती असलेले ९० की.मी.कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर डाॅ . सत्यजित यांच्याबरोबर सर्व ट्रेनिंग रन मिळूनच केल्या. तर मॅरेथॉन यशस्वीरित्या व ईंजुरी फ्री पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेला ट्रेनिंग प्लान त्यांच्या नणंद डॉ.स्मिता झांजुर्णे ज्यांनी यांनी बॅक टू बॅक काॅम्रेड मॅरेथॉन फिनिश केली आहे त्यांनी दिला.
या मॅरेथॉन मध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील तीघे सदस्य म्हणजे ,त्यांचे पती डॉ. सत्यजित वाघचवरे, आयर्न मॅन व कॉम्रेड फिनिशर असलेले डॉ .अभिजीत वाघचवरे व त्यांच्या पत्नी डॉ.राजश्री वाघचवरे यांनी देखील सहभाग नोंदवून ती मॅरेथॉन यशस्वी रित्या पूर्ण केली.
दरम्यान सातारा मॅरेथॉन एक्सपो मध्ये सातारा मॅरेथॉनचे संस्थापक डॉ.संदीप काटे यांनी गेल्या रविवारी हैदराबाद येथे एकाच दिवशी म्हणजे सकाळी 42 किमी फुल मॅरेथॉन व सायंकाळी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेऊन दोन्हीही ईव्हेंट यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल वाघचवरे कुटुंबीयांनी त्यांचा गौरव केला, याप्रसंगी श्री
.सत्यवान वाघचवरे, सौ.शीला वाघचवरे, डॉ.अजित भोसले, डॉ. परिक्षीता भोसले उपस्थित होते.

