श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त ह.भ.प.शिवलाल महाराज यांच्या‎ दिव्य‎ सानिध्यात गुलाल सोहळा

श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त ह.भ.प.शिवलाल महाराज यांच्या‎ दिव्य‎ सानिध्यात गुलाल सोहळा

सोलापूर‎ – महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२ मधील श्रीकृष्ण‎ अध्यात्मिक‎ मठ‎ सेटलमेंट फ्री‎ कॉलनी‎ चव्हाण वस्ती परिसरातील‎ श्रीकृष्ण मठात जन्माष्टमीनिमित्त‎ विविध धार्मिक‎ कार्यक्रमांचे आयोजन‎ करण्यात‎ आले होते. शनिवारी दुपारी जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भक्तिमय गुलाल सोहळा‎ मोठ्या उत्साहात,‎ भक्तिभावपूर्ण व मंगलमय‎ वातावरणात संपन्न झाला गुलाल सोहळ्याच्या‎ प्रारंभी‎ संपूर्ण सेटलमेंट‎ परिसरातून‎ नगर‎ प्रदक्षिणा काढण्यात‎ आली.‎

यावेळी‎ भाविकांनी मोठ्या‎ संख्येने सहभागी‎ होत‎ ‘गोविंदा’च्या जयघोषात उत्स्फूर्त‎ सहभाग‎ नोंदविला.‎ नगर प्रदक्षिणेदरम्यान‎ परिसरात‎ भक्तिमय वातावरण निर्माण‎ झाले होते.‎ या‎ सोहळ्यास‎ १०३‎ वर्षीय‎ ह.भ.प.‎ शिवलाल‎ स्वामी महाराज यांची‎ विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी‎ उपस्थित‎ भक्तांना‎ श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीचे आध्यात्मिक व‎ धार्मिक‎ महत्त्व सांगितले.‎ भगवान‎ श्रीकृष्णांनी दिलेला‎ प्रेम,‎ भक्ती, कर्म, सत्य आणि‎ धर्माचा संदेश‎ प्रत्येकाने आपल्या‎ जीवनात‎ आचरणात‎ आणावा,‎ असे‎ आवाहन‎ त्यांनी‎ केले.‎

भक्तीमध्ये‎ श्रद्धा आणि आचरणामध्ये‎ सदाचार‎ असेल,‎ तर‎ जीवनाला‎ सकारात्मक‎ दिशा मिळते, असा संदेशही‎ त्यांनी दिला. यावेळी पोलीस आयुक्त‎ एम. राजकुमार यांनी श्रीकृष्ण‎ भगवान‎ यांचे दर्शन घेऊन‎ आशीर्वाद‎ घेतला.‎ तसेच ह.भ.प.शिवलाल‎ स्वामी‎ महाराजांचे‎ आशीर्वाद‎ घेतल्यानंतर‎ त्यांनी‎ उपस्थित‎ भक्तगणांना‎ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा‎ दिल्या जन्माष्टमीच्या‎ पवित्र‎ उत्सवानिमित्त भाविकांसाठी‎ महाप्रसादाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ उपस्थित‎ मान्यवरांच्या हस्ते‎ महाप्रसादाचे पूजन‎ करण्यात‎ आले.

याप्रसंगी उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी देवकर,‎ पोलीस‎ आयुक्त एम. राजकुमार,‎ डॉ. सूर्यप्रकाश कोठे,‎ भाजपचे ज्येष्ठ‎ नेते दिलीप‎ कोल्हे,‎ प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक‎ किसन जाधव, नागेश‎ मामा बाबुराव गायकवाड,‎ सलगर‎ वस्ती‎ पोलीस‎ स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक‎ श्रीशैल‎ गजा,लहू गायकवाड, सुधीर‎ बहिरवाडे, श्रीकांत‎ श्रीराम जाधव, सचिन विलास जाधव‎ यांच्यासह वारकरी‎ संप्रदायातील‎ भक्तगण विविध‎ क्षेत्रांतील मान्यवर आणि‎ मोठ्या‎ संख्येने भाविक‎ उपस्थित होते.‎