सोलापूर – येथील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू समृद्धी चट्टे हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित अंडर-15 मुलींच्या क्रिकेट कॅम्पसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समृद्धी सध्या श्री साई समर्थ क्रीडा भारती क्रिकेट क्लब, रेल्वे ग्राऊंड, सोलापूर येथे मुख्य प्रशिक्षक अनिल सम्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे समृद्धीने आपल्या खेळात सातत्यपूर्ण प्रगती करत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
समृद्धीच्या निवडीबद्दल तिचे पालक, प्रशिक्षक अनिल सम्राणी, श्री साई समर्थ क्रीडा भारती क्रिकेट क्लबचे पदाधिकारी तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करून मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.
