मुंबई – सोलापूर जिल्ह्यातील तालुका दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट मौजे वळसंग भिमनगर येथील दलित बांधवांनी “जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विहीरीचे पाणी पित नाहीत. तोपर्यंत आम्ही पाण्याचा थेंबही स्पर्श करणार नाही असा निर्धार केला होता. त्यानुसार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी रेश्मी धागा आणि चांदीचा ग्लास बुडवुन या वळसंग ऐतिहासिक विहिरीचे उद्धघाटन केले होते.
या विहीरीचे वैशिष्ट्य हे पाणी कधीच आटत नाही. १९८२ च्या भीषण दुष्काळातही या विहीरीचा पाण्याचा झरा अविरत होता. दिनांक २४ जानेवारी १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौजे वळसंग ता. दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील ऐतिहासिक स्थळाच्या या विहिरीचे उदघाटन केले होते. सदरच्या स्थळाचे सभोवताली सुशोभीकरण करणे बाबतचे अंदाजपत्रक रक्कम रुपये ४.०० कोटी रुपयाचे बनवले असून त्याचा विकास करणे क्रमप्राप्त आहे.
मौजे वळसंग तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील ऐतिहासिक विहिरी सभोवताली सुशोभीकरण करण्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी व महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केले आहे. वरील निधी मिळणेसाठी समस्त मौजे वळसंग ता. दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आदरपुर्वक विनंती आहे.
मौजे वळसंग ता. दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे ऐतिहासिक स्थळाच्या विहीरी सभोवताली सुशोभीकरण करण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेतुन निधी उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी उर्वरित सुशोभीकरण कामाकरिता निधी मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष मा.ना.श्री. अण्णासाहेब बनसोडे यांना निवेदन दिले.

