शहरातील सर्व दाल-चावल विक्रेत्यांच्या हॉटेल्स आणि गाड्यांवरील खाद्यपदार्थांची तपासणी करा : नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर

शहरातील सर्व दाल-चावल विक्रेत्यांच्या हॉटेल्स आणि गाड्यांवरील खाद्यपदार्थांची तपासणी करा : नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर

सोलापूर – दोन दिवसांपूर्वी कीर्ती नगर येथील एम.आय.डी.सी. (MIDC) हद्दीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित भाविकांसाठी ‘शाकाहारी दाल-चावल’ महाप्रसाद/दावत म्हणून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर जेवण बनवण्याचे कंत्राट आचारी अब्बास अली मुल्ला याला देण्यात आले होते.
परंतु, अत्यंत खेद आणि संतापाची बाब अशी की, या जेवणात ‘जनावराची चरबी’ वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यामुळे परिसरातील तमाम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित आचाऱ्याची व यामागे असलेल्या टोळीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी:
सोलापूर शहरात अनेक ठिकाणी ‘दाल-चावल’चे गाडे आणि स्टॉल्स लावले जातात. प्रशासनाने अशा सर्व ठिकाणी तातडीने धाडी टाकून तेथील खाद्यपदार्थांच्या दर्जाची आणि घटकांची तपासणी करावी.
स्पष्ट फलक लावण्याचे आदेश द्यावेत:
जर कोणत्याही दाल-चावल किंवा खाद्यपदार्थात मांसाहारी घटक अथवा जनावरांची चरबी वापरली जात असेल, तर संबंधित चालकांना त्यांच्या गाड्यावर किंवा फलकावर “हे अन्न मांसाहारी (Non-Veg) आहे” असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) परिमंडळाचे सहाय्यक आयुक्त देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.