जागतिक योग दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर‎ वनविहार‎ येथे‎ उत्साहात योग साधना

जागतिक योग दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर‎ वनविहार‎ येथे‎ उत्साहात योग साधना

सोलापूर‎ -‎ २१ जून‎ जागतिक‎ योग‎ दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर‎ वनविहार येथे योगशिक्षक‎ चंद्रकांत (ब्रदर) जाधव व सुहास‎ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली‎ योग‎ दिन‎ उत्साहपूर्ण‎ वातावरणात संपन्न झाला.‎ पहाटेच्या प्रसन्न‎ वातावरणात उपस्थितांनी‎ विविध‎ योगासने, प्राणायाम व‎ ध्यानसाधना‎ करून‎ योगाचे‎ महत्त्व प्रत्यक्ष‎ अनुभवले.‎

यावेळी सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे‎ भाजपा नगरसेवक किसन जाधव, एमआयडीसी पोलीसचे‎ पोलीस निरीक्षक‎ विजयकुमार‎ खोमणे,‎ पोलीस‎ निरीक्षक‎ दत्ता‎ जाधव, पोलीस हवालदार‎ दत्ता‎ उर्फ‎ अक्षय‎ जाधव,‎ वरिष्ठ सांख्यिक अधिकारी‎ अशोक कुमार, दिलीप कुमार, विविध‎ विभागांचे कर्मचारी तसेच‎ शिक्षक सुहास‎ सर यांच्यासह‎ अनेक नागरिक मोठ्या‎ संख्येने‎ उपस्थित‎ होते.‎

याप्रसंगी‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव यांनी मनोगत‎ व्यक्त करताना सांगितले‎ की, योग ही‎ केवळ व्यायाम‎ पद्धती नसून‎ भारतीय‎ संस्कृतीची‎ अमूल्य देणगी‎ आहे.‎ आजच्या धकाधकीच्या‎ जीवनात‎ शारीरिक स्वास्थ्याबरोबरच‎ मानसिक‎ शांतता‎ आणि‎ सकारात्मक‎ विचारांसाठी योग अत्यंत आवश्यक‎ आहे.‎ नियमित‎ योगाभ्यासामुळे अनेक आजारांपासून‎ संरक्षण मिळते‎ तसेच‎ व्यक्तिमत्त्व विकासालाही‎ चालना मिळते.‎ प्रत्येक‎ नागरिकाने दररोज‎ काही‎ वेळ‎ योगासाठी देऊन‎ निरोगी‎ जीवनशैली‎ अंगीकारावी जागतिक स्तरावर योगाचा प्रसार व्हावा यासाठी भारताने‎ महत्त्वपूर्ण‎ भूमिका बजावली‎ असून देशाचे‎ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी‎ यांनीही‎ योग दिनानिमित्त‎ आयोजित‎ कार्यक्रमात सहभाग नोंदवला.‎ त्यांच्या‎ आवाहनानुसार देशभरात‎ विविध ठिकाणी भल्या‎ पहाटे योग दिन‎ उत्साहात‎ साजरा‎ करण्यात‎ आला.

कार्यक्रमाच्या‎ शेवटी उपस्थितांनी‎ नियमित योग‎ करण्याचा संकल्प‎ केला. योगाच्या माध्यमातून‎ निरोगी भारत‎ व‎ सशक्त समाज निर्माण‎ करण्याचा‎ संदेश यावेळी‎ देण्यात‎ आला.‎