संभाजी आरमार च्या वतीने रविवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 

संभाजी आरमार च्या वतीने रविवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 

सोलापूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तसेच संभाजी आरमार संघटनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र सोलापूर येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील सर्वसामान्य व गरजू कुटुंबांना आधार मिळावा, विवाह सोहळे साधेपणाने आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडावेत या उद्देशाने या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आठ वधू-वर जोडपे  विवाह बंधनात अडकणार असून, या सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचा संदेश देण्याचा संभाजी आरमार संघटनेच्या प्रयत्न  आहे.

या विवाह सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे, शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे याच बरोबर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नवदांपत्यांना शुभाशीर्वाद देण्यात येणार आहेत.

संभाजी आरमार संघटनेने गेल्या १८ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत असून, या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामुदायिक विवाह सोहळा हा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

तरी या भव्य सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशिर्वाद द्यावेत, असे आवाहन संभाजी आरमार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे.