गायत्री पूजा मार्टचा विस्तार; ६०००पेक्षा अधिक पूजा साहित्यासह शुद्धतेचा नवा अध्याय

गायत्री पूजा मार्टचा विस्तार; ६०००पेक्षा अधिक पूजा साहित्यासह शुद्धतेचा नवा अध्याय


सोलापूर – कोरोनाच्या कठीण काळानंतर २०१९ मध्ये घरपोच पूजा साहित्य सेवा सुरू करून अल्पावधीतच ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन केलेल्या ‘गायत्री पूजा स्टोअर’ने आता आपल्या सेवेचा विस्तार केला असून, ७० फूट रोड येथे ‘गायत्री पूजा मार्ट’ या नावाने एका भव्य व नवीन पर्वाचा प्रारंभ केला असल्याची माहिती पं. दॆविदास कुरापाटी (पंतलू) यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

धार्मिक परंपरा, शुद्धता आणि विश्वास जपत प्रत्येकाच्या घरापर्यंत दर्जेदार पूजा साहित्य पोहोचवणे हेच या मार्टचे मुख्य ध्येय आहे. आजच्या धावपळीच्या युगात ग्राहकांना सर्व पूजा साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या नवीन मार्टची उभारणी करण्यात आली असून, येथे ६००० पेक्षा अधिक प्रकारच्या पूजा साहित्याचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शुद्ध कुंकू, शुद्ध हळद, भीमसेनी कापूर, पूजेचा कापूर आणि इतर विविध साहित्याचा समावेश असून शुद्धता, गुणवत्ता आणि योग्य दर यांचा सुवर्णसंगम येथे पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, सर्व धार्मिक व शुभकार्यांसाठी लागणारे आवश्यक साहित्य आता ग्राहकांना एकाच ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होणार आहे.


धार्मिक विधींच्या सोयीसाठी गायत्री पूजा मार्टने विविध पूजा पॅकेजची संकल्पना राबवली असून, त्यामध्ये भूमिपूजन, वास्तुशांती, नामकरण, विवाह संस्कार, हवन-होमहवण, नवचंडी किंवा नवदुर्गा पूजा, गणपती उत्सव आणि दिवाळी पूजन यांसारख्या सर्व महत्त्वाच्या कार्यांसाठी लागणारे संपूर्ण साहित्य अल्प दरात आणि पॅकेज स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. यामुळे साहित्याची जुळवाजुळव करताना होणारी भाविकांची धावपळ थांबणार आहे. याशिवाय, मार्टमध्ये चौरंग, पाट, तांब्याची व पितळी भांडी भाड्याने देण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. देवघरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व देवतांच्या शास्त्रोक्त मूर्ती, देवतांसाठी लागणारी विविध वस्त्रे व अलंकार तसेच विविध धार्मिक ग्रंथांचा मोठा संग्रह येथे उपलब्ध आहे. ही सेवा केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही, तर पुरोहित वर्गासाठी देखील अत्यंत सोयीची ठरणार आहे. लग्न समारंभासाठी लागणारा हळद सेट, जाते, उखळ, चांदीचे उखळ आणि इतर पारंपरिक साहित्याची उपलब्धता हे या मार्टचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आगामी सण-उत्सवांचे औचित्य साधून विशेष पॅकेजची घोषणा देखील करण्यात आली आहे.


येत्या काळात येणाऱ्या सणांसाठी गायत्री पूजा मार्टने जय्यत तयारी केली असून, गणपती उत्सवासाठी संपूर्ण पूजा साहित्याचे आकर्षक पॅकेज तयार करण्यात आले आहे. तसेच दसरा विशेष मोहिमेअंतर्गत नवदुर्गा, नवचंडी आणि होमहवण करण्यासाठी लागणारे तूप व हवन सामग्री होलसेल दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजनासाठी विशेष भेटवस्तूसह लक्ष्मी पूजन साहित्य, कमळ आणि इतर सर्व आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

अत्यंत पारदर्शक कारभार आणि शुद्धतेची हमी देत गायत्री पूजा मार्टने ७० फूट रोड परिसरात आपल्या सेवेचा शुभारंभ केला असून, या सुविधेचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. या विस्तारामुळे धार्मिक साहित्याच्या बाजारपेठेत गायत्री पूजा मार्टने आपले स्थान अधिक भक्कम केले असून, त्यांच्या या नवीन उपक्रमाला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.