साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पी.बी. ग्रुप च्या वतीने विनम्र अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पी.बी. ग्रुप च्या वतीने विनम्र अभिवादन

सोलापूर – शनिवार दिनांक १८/०७/२०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर. येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी.बी. ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त एडवोकेट सुनील कांबळे व संजय देवकते यांच्या वतीने आणा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी ॲड. सुनील कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवन मार्ग काढलेला आहे वंचित कामगार व पीडित या लोकांना जवळून पाहिलेला आहे. त्याच अनुभवावरती त्यांनी कथा पोवाडे साहित्य असे विविध लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी नेहमी असे सांगितलेले आहे की जे वंचित आहेत जे गरीब आहेत ज्या ठिकाणी सामाजिक विषमता आहे ते दूर करण्यासाठी ते नेहमी लेखणीतून संघर्ष केलेला आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांची अत्यंत उत्कृष्ट अत्यंत महत्त्वाची फकीरा ही कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केलेली आहे. त्यांच्या एका सुप्रसिद्ध लेखातून त्यांनी असे सांगून गेलेले आहे की जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराय या पद्धतीचे घोषवाक्य त्यांनी त्यांच्या गीतातून सांगितलेले आहे. शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे असे म्हणत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे, भारत (मालक) बाबरे, गौतम (महाराज) चंदनशिवे, गोपीनाथ जाधव, गौतम नागटिळक, पी.बी.ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, भैया कापुरे,‌बाबा गायकवाड, प्रशांत गवळी, बाळू शिंदे, मनोज थोरात, जितेंद्र कांबळे, सुशांत मुळीक, नाना निंबाळकर, तुषार गंटोल, योगेश सरवदे, विनायक क्षीरसागर, रवी सकट, प्रतीक चंदनशिवे, कैलास वाघमारे, सागर देडे, आकाश कुचेकर, शुभम कांबळे, आशिष पात्रे, सुनील कांबळे, गौतम शिंदे, रोहन तळभंडारे, तसेच पी.बी. ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते