छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत “समाधान शिबिर”

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत “समाधान शिबिर”

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत तहसील कार्यालय, उत्तर सोलापूर यांच्या वतीने छत्रपती रंगभवन, सोलापूर येथे “समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्यचे आमदार श्री. देवेन्द्र दादा कोठे यांच्या हस्ते झाले.

या शिबिरास सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले, योजनांची माहिती तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचे तत्काळ निवारण या शिबिरामध्ये करण्यात आले.


यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार निलेश पाटील, शिल्पा पाटील, उपमहापौर. ज्ञानेश्वरी देवक, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, भारतसिंह बडूरवाले, रवि काय्यावाले, ऋषिकेश मैट्रे, सिद्धेश्वर कमटम, सात्विक बडवे, नगरसेविका सुनीता कामठी, नगरसेविका श्रीदेवी पुलारी, शंकर चैगुले, नागेश खरात, दीपक राजगे, नागेश सरगम यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


शिबिरामध्ये ७/१२ व ८-अ उतारे, फेरफार नोंदी, ई-पीक पाहणी, जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, तसेच विविध महसुली विषयांवरील मार्गदर्शन व अर्जांच्या निवारणाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. अशा समाधान शिबिरांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत असून प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालय, उत्तर सोलापूर येथील अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व संबंधित विभागांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.