सोलापूर : उत्तर सदर बाजार मधील महावीर तालीम चौक मातंग समाज मंदिर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ गुरुवारी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यांसाठी १८ लाख ७७ हजार रुपयांचा विकासनिधी देण्यात आला आहे. प्रारंभी स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे,
माजी नगरसेवक जेम्स जंगम यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे,
माजी नगरसेवक जेम्स जंगम, नगरसेवक रवी कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, निर्मला जंगम, जुगनबाई आंबेवाले, ऋषिकेश मेट्रे, अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महावीर तालीमचे अध्यक्ष अनंत गोडलोलू, करेप्पा जंगम, अविनाश बेंजरपे, सुरेश पाटोळे, अशोक सायबोळू, रेणुका गोडलोलू, मोहन बाडीवाले, सुरज विटे उपस्थित होते. यावेळी सचिन गोडलोलू घर ते सागर कोरे घर व परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मोची समाज बांधवांसाठी आवश्यक असलेल्या सर्व विकासकामांची पूर्तता आगामी काळात करण्यात येणार आहे. सभामंडप, समाज मंदिरे, रस्ते या विकासकामांबरोबरच शहराला दररोज पाणी देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरासाठी १ हजार ४०० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात येणार आहे. त्यापुढील दोन वर्षांमध्ये सोलापूर शहराला दररोज पाणी देण्यासाठी सर्वत्र नवीन पाईपलाईन आणि नव्या टाक्या बांधण्याचे काम पूर्ण होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या मोची समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही आमदार देवेंद्र कुठे याप्रसंगी म्हणाले.
बाजारभावाप्रमाणे सुमारे २० कोटी रुपये किंमत असलेली जागा मोची समाजाच्या शिक्षण संकुलासाठी शासनाच्या माध्यमातून रेडी रेकनर च्याही अवघ्या २० टक्के रकमेत मिळवून देण्यात यश मिळाले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असा निर्णय झालेला नाही. परंतु मोची समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी भाजपा सरकारने हा निर्णय घेतला आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
यावेळी अर्जुन नामदास, हरीश जंगम, सोनू खरात, नागेश म्हेत्रे, कृष्णा जंगम, आदी उपस्थित होते.

