सोलापूर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पार्क चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे भाजपाचे नगरसेवक किसन जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना भारतीय संविधानाची प्रतिमा भेट देत आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन केले.
यावेळी अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे युवा आमदार देवेंद्र दादा कोठे, महापौर विनायक दादा कोंड्याल, भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, भाजपा नेते शहाजी पवार, नगरसेवक गणेश वानकर, स्वीकृत नगरसेवक मनीष केत, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, संजय भंडगे, संतोष ऋतिक गायकवाड, माणिक कांबळे, महादेव राठोड, यल्लाप्पा शिवपुरीआदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे भारतीय लोकशाहीचे भक्कम अधिष्ठान आहे. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असलेले संविधान प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम करते. संविधानाचा आदर राखणे आणि त्याच्या तत्वांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधानाची प्रतिमा भेट देण्यामागील उद्देश म्हणजे समाजात संविधानाबद्दल जागृती निर्माण करणे हा आहे. आजच्या पिढीने संविधानातील मूल्ये जाणून घेत त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
