सोलापूर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती १४ मे जवळ आली असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी स्वच्छता व विविध समस्या सोडण्यात याव्यात अशी मागणी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आयुक्त ओंबासे यांनी तात्काळ फ़ोन करून संबंधित अधिकाऱ्याला त्वरित काम करून घेण्याचे आदेश दिले. नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या सोबत बैठक संपन्न झाली.
या प्रमुख मागण्या –
१) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या बांधकामाच्या दगडास रंगरंगोटी करणे.
२) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर ऑयलैंड मध्ये शंभुमुद्रा बसविण्यात आलेली आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांना सांगूनसुध्दा त्याचे विद्युत दिवे बंद आहेत. ते त्वरीत सुरू करावेत.
३) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक हा रात्रीला अंधारमय झालेला असतो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा दिसून येत नाही. त्याकरिता येथील संपूर्ण परिसरात दिवाबत्तीची कायमची सोय करण्यात यावी.
४) छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशा LED लाईटची सोय करण्यात यावी.
५) सन २०२५ मध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील ऑयलॅन्डमध्ये २५ मावळे, २ तोफा, १०० फुट भगवा झेंडा बसविण्या संदर्भात आपणास निवेदन देवून पाठपुरावा करूनसुध्दा या संदर्भात निर्णय घेतला नाही तरी यावर निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी व्हावी.
यावेळी शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ संस्थापक राम जाधव, विश्वस्त पवन आलुरे, राहुल दहीहंडे, विकास ढेपे, शुभम खाटमोडे आदी जण उपस्थित होते.

