आ. देवेंद्र कोठे यांनी केले मुख्यमंत्र्यांचे सारथ्य शहरवासीयांत चर्चा

आ. देवेंद्र कोठे यांनी केले मुख्यमंत्र्यांचे सारथ्य शहरवासीयांत चर्चा

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यानंतर विमानतळाला जाताना मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.

सोलापूर शहराच्या विकासाचा विचार करून विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठामपणे उभे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मंगळवारी झालेल्या सभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे कौतुक केले. आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेल्या विकासकामांना गती देण्याची ग्वाही देखील भाषणातून दिली. सभेनंतर सोलापूर विमानतळाला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गाडीतून प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते गाडीत होते.