ईच्छा‎ भगवंताचीपरिवाराकडूनआमदार‎ सचिनकल्याणशेट्टीयांचासत्कार

ईच्छा‎ भगवंताचीपरिवाराकडूनआमदार‎ सचिनकल्याणशेट्टीयांचासत्कार

सोलापूर‎ – श्रीक्षेत्र‎ अक्कलकोट‎ येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामी‎ समर्थ‎ महाराजांच्या‎ पवित्र‎ भूमीचा‎ सर्वांगीण विकास‎ करून अक्कलकोटला जागतिक‎ दर्जाचे तीर्थक्षेत्र‎ म्हणून विकसित करण्याच्या‎ दिशेने महत्त्वपूर्ण‎ पाऊल‎ उचलण्यात‎ आले आहे.‎ अक्कलकोट‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे पाणीदार‎ आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांनी‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र‎ फडणवीस यांच्याकडे‎ सातत्याने पाठपुरावा‎ करत‎ मांडलेल्या‎ ‘श्री‎ स्वामी समर्थ‎ ग्रीन‎ कॉरिडॉर’ संकल्पनेला‎ राज्य शासनाने‎ सकारात्मक‎ प्रतिसाद‎ दिला‎ आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस‎ यांनी प्रकल्पाच्या‎ पहिल्या‎ टप्प्यासाठी सुमारे‎ ५०० कोटींचा विकास‎ आराखडा‎ तातडीने तयार करून‎ शासनाकडे‎ सादर‎ करण्याचे आदेश दिल्याने‎ लाखो‎ स्वामी भक्तांमध्ये समाधानाचे‎ वातावरण‎ निर्माण‎ झाले आहे. या‎ ऐतिहासिक निर्णयाबद्दल ईच्छा भगवंताची परिवाराचे‎ मार्गदर्शक तथा सोलापूर‎ महानगरपालिकेचे प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे‎ भाजपा‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांच्या‎ नेतृत्वाखाली ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या वतीने अक्कलकोट येथील संपर्क कार्यालयात आमदार‎ सचिन‎ कल्याणशेट्टी‎ यांचा शाल,‎ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन‎ जाहीर‎ सत्कार‎ करण्यात‎ आला. यावेळी नगरसेवक‎ किसन जाधव‎ म्हणाले, श्री स्वामी‎ समर्थ ग्रीन कॉरिडॉर हा प्रत्येक‎ स्वामी भक्ताच्या‎ श्रद्धेशी‎ जोडलेला ऐतिहासिक प्रकल्प आहे.

या प्रकल्पामुळे देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक‎ दर्शन‎ व्यवस्था उपलब्ध होईल.‎ मंदिर परिसराचे सुशोभीकरण,‎ पार्किंग, स्वच्छता, पायी‎ चालणाऱ्या‎ भाविकांसाठी‎ स्वतंत्र‎ मार्ग आणि‎ अत्याधुनिक‎ सुविधा‎ यामुळे अक्कलकोटच्या धार्मिक‎ वैभवात‎ मोलाची‎ भर‎ पडणार‎ आहे.‎ आमदार सचिन‎ दादा‎ कल्याणशेट्टी यांनी स्वामी‎ भक्तांच्या भावनांचा‎ आदर‎ राखत घेतलेला‎ हा‎ पुढाकार‎ कायम स्मरणात‎ राहील. सत्काराला उत्तर‎ देताना‎ आमदार सचिन‎ कल्याणशेट्टी म्हणाले, श्री‎ स्वामी समर्थ ग्रीन‎ कॉरिडॉर हा केवळ बांधकामाचा‎ प्रकल्प नाही, तर‎ लाखो‎ स्वामी भक्तांच्या श्रद्धेचा‎ आणि विश्वासाचा‎ सन्मान आहे.‎

या‎ माध्यमातून भाविकांना‎ अधिक सुलभ, सुरक्षित आणि‎ नियोजनबद्ध दर्शन व्यवस्था‎ उपलब्ध होईल.‎ अक्कलकोटमध्ये धार्मिक‎ पर्यटनाला‎ मोठी‎ चालना‎ मिळेल. त्यामुळे हॉटेल व्यवसाय,‎ व्यापारी,‎ वाहनचालक,‎ लघुउद्योजक आणि‎ स्थानिक नागरिकांसाठी‎ रोजगाराच्या नव्या‎ संधी निर्माण होतील.‎ श्रीक्षेत्र‎ अक्कलकोटचा सर्वांगीण‎ विकास‎ व्हावा या उद्देशाने आम्ही‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ यांच्याकडे हा प्रस्ताव‎ मांडला आणि त्यांनी कोणताही‎ विलंब‎ न‎ करता त्यास‎ मंजुरी‎ देऊन‎ प्रकल्पाला गती दिली.‎ यासाठी‎ मी त्यांचे मनःपूर्वक‎ आभार‎ मानतो. तसेच ईच्छा भगवंताची‎ परिवाराने‎ माझा केलेला सन्मान‎ हा माझ्यावरील‎ प्रेमाचा आणि स्वामी‎ भक्तांच्या आशीर्वादाचा स्वीकार असून, संपूर्ण परिवाराचे मी‎ मनःपूर्वक आभार व्यक्त‎ करतो.‎

यावेळी सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज‎ गायकवाड, चेतन नागेश‎ अण्णा गायकवाड,‎ हुलगप्पा शासम, महादेव राठोड, पाटील, यल्लाप्पा‎ शिवपुरे‎ यांच्यासह‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे‎ पदाधिकारी व‎ स्वामी‎ भक्त मोठ्या संख्येने‎ उपस्थित‎ होते.‎ उपस्थितांनी‎ हा प्रकल्प अक्कलकोटच्या‎ धार्मिक, सामाजिक आणि‎ आर्थिक‎ विकासाला‎ नवी‎ दिशा देणारा‎ ठरेल, असा विश्वास‎ व्यक्त‎ केला.