सोलापूर : महानगरपालिकेच्या इतिहासातील विक्रमी १८० हून अधिक ठराव एकच सर्वसाधारण सभेत मंजूर केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा सोमवारी सत्कार केला.
सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. या सभेच्या अजेंड्यावर विक्रमी १८० हून अधिक विषय होते. महापौर विनायक कोंड्याल यांनी या सर्व विषयांना मंजुरी देत सर्वसाधारण सभा गाजवली.
सभागृहातील प्रत्येकाला बोलण्याची संधी देत अनावश्यक वेळ न दवडता महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व विषयांना मंजुरी देत, नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देत सर्व सदस्यांचे समाधान केले. महापौर विनायक कोंड्याल यांच्या या कार्यशैलीचे सर्वांनीच कौतुक केले. सोमवारी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी विनायक कोंड्याल यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कौतुक केले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम,नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक अक्षय अंजिखाने, शाहूजी सलगर मंडल अध्यक्ष नागेश सरगम, दीपक राजगे आदी उपस्थित होते.

