सोलापूर महानगरपालिकेच्या सहा विषय समिती सभापतींच्या कार्यालयांचे उद्घाटन संपन्न

सोलापूर महानगरपालिकेच्या सहा विषय समिती सभापतींच्या कार्यालयांचे उद्घाटन संपन्न

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सहा विषय समिती सभापतींच्या कार्यालयांचे उद्घाटन आज महापौर श्री. विनायक कोंड्याल आणि आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी नवनियुक्त सभापतींना शुभेच्छा देत नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विकासाभिमुख कामकाजासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

उद्घाटन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये स्थापत्य समितीच्या सभापती सौ. विजया चीप्पा, विधी समितीचे सभापती श्री. सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापती श्री. सुनील खटके, शहर सुधारणा समितीच्या सभापती सौ. स्वाती बडगु, मंडई व उद्यान समितीचे सभापती श्री. राजशेखर पाटील तसेच कामगार व समाजकल्याण समितीच्या सभापती सौ. श्रद्धा पवार यांच्या कार्यालयांचा समावेश होता.

यावेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते श्री. नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती सौ. रंजीता ताई चाकोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. निर्मलाताई जंगम, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. रोहिणी ताई तडवळकर, नगरसेवक श्री. सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक अजय पोनम,श्री. प्रशांत पल्ली, श्री. सात्विक बडवे, श्री. आनंत नेते जाधव, श्री. श्रीनिवास दयामा नगरसेविका अर्चना वडनाल नगरसेविका संगीता जाधव यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरसेविका, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी विषय समित्या या महानगरपालिकेच्या प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असून शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नागरिकांच्या अपेक्षांनुसार दर्जेदार सेवा, विकासकामांना गती, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया यासाठी सर्व समित्यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.