सोलापूर – शहरातील उद्योजक सुयश खानापुरे आणि सोनाली खानापुरे यांनी रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील यशस्वी वाटचालीनंतर आता सौंदर्य क्षेत्रात दमदार एन्ट्री करत ‘यश लॅक्मे सलून’ या अत्याधुनिक उपक्रमाची शानदार सुरुवात केली आहे. यश आयकॉन रेल्वे लाईन, मोदी खाना परिसरात १ एप्रिल रोजी या सलूनचा भव्य शुभारंभ सुयश खानापुरे यांच्या मातोश्री गंगाबाई जनबसप्पा खानापुरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याला शहरातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. उद्योजक ब्रिजमोहन फोफलिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, आमदार विजयकुमार देशमुख, प्रमोद मोरे, डॉ. किरण देशमुख, संतोष पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सुरज मुलानी, शिंगाडे, RTO निरीक्षक संदीप शिंदे,मृगेंद्र चडचणकर, अक्कलकोटचे सौ.वनिता खेडगी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
४० वर्षांची परंपरा, जागतिक दर्जाच्या सेवा
‘Lakmé Salon’ हा देशातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्युटी ब्रँड असून ४० वर्षांहून अधिक अनुभवासह देशभरातील १२५ हून अधिक शहरांमध्ये ४०० पेक्षा जास्त शाखांद्वारे सेवा देत आहे. हेअर कट, हेअर कलरिंग, स्किन केअर, फेशियल, ब्रायडल मेकअप आणि आधुनिक ग्रूमिंग सेवांसाठी हा ब्रँड विशेष ओळखला जातो.
सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक सुविधा
‘यश लॅक्मे सलून’मध्ये प्रशिक्षित स्टायलिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट्सद्वारे जागतिक दर्जाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षिततेचे काटेकोर पालन यामुळे ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह अनुभव मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
महानगरांप्रमाणे आधुनिक सौंदर्य सेवा आता सोलापूरमध्येच उपलब्ध होत असल्याने शहराच्या विकासात आणखी एक नवे परिमाण जोडले जाणार आहे.
५ एप्रिलपासून सेवा सुरू
हे अत्याधुनिक सलून येत्या ५ एप्रिलपासून नागरिकांसाठी खुले होणार असून, सोलापूरकरांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सुयश खानापुरे व सोनाली खानापुरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला यश डेव्हलपर्सचे डायरेक्टर गुरुसिद्धप्पा हणमशेट्टी, बापूसाहेब पाटील, अजय फलमारी, मयूर दरगड, राहुल चंडक, धीरेंद्र हैदराबादवाले, रोहन बायस, रितेश बायस, सिद्धेश्वर खानापुरे, अक्षय वाकसे, अखिल हणमशेट्टी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

