ईच्छा भगवंताची परिवाराकडून‎ नूतन राज्यसभा‎ खा. ज्योती वाघमारे‎ यांचा सत्कार 

ईच्छा भगवंताची परिवाराकडून‎ नूतन राज्यसभा‎ खा. ज्योती वाघमारे‎ यांचा सत्कार 

सोलापूर‎ – शहरातील‎ सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरातील‎ एका सामान्य‎ कुटुंबातून‎ आलेल्या लेकीने‎ आज थेट‎ दिल्लीतील संसदेत‎ झेप घेत‎ सोलापूरचा आवाज‎ बुलंद‎ केला आहे. राज्यसभेच्या‎ खासदारपदी‎ प्रा. डॉ. ज्योतीताई‎ वाघमारे‎ यांची‎ बिनविरोध‎ निवड झाल्याबद्दल ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या वतीने‎ त्यांचा‎ अत्यंत उत्साही वातावरणात रेल्वे‎ लाईन येथील किसन जाधव‎ यांच्या‎ संपर्क कार्यालय येथे‎ सन्मानपूर्वक सत्कार‎ करण्यात‎ आला.‎

या‎ वेळी‎ सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे‎ भाजपा नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांनी ज्योतीताई‎ वाघमारे‎ यांना‎ खासदार ताई‎ नमूद‎ असलेले‎ मानाचा निळा‎ फेटा,‎ शाल, भारताच्या‎ संविधानाचे पुस्तक‎ तसेच मोची समाजाचे‎ आराध्य दैवत आदी जांबमुनी महाराजांची प्रतिमा‎ देऊन भव्य‎ हार घालून सन्मानित केले.‎ यावेळी त्यांचे‎ स्वागत हलग्यांच्या कडकडाटात‎ व‎ फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले.‎ संघर्षमय‎ जीवनप्रवासातून‎ आमच्या भगिनी‎ ‘भीम कन्या’ म्हणून उभ्या‎ राहिलेल्या‎ ज्योतीताईंची राज्यसभेवर‎ झालेली‎ निवड ही सोलापूरसाठी‎ अभिमानाची व‎ प्रेरणादायी‎ घटना ठरली‎ आहे.‎ सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरात वास्तव्य‎ होती‎ ही लेक‎ आता संसदेत‎ सोलापूरचा आवाज ठरणार‎ आहे,‎ असे‎ भावनिक उद्गार‎ व्यक्त करत‎ किसन‎ जाधव यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा‎ दिल्या.‎ तसेच‎ सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्या‎ नक्कीच प्राधान्य‎ देतील,‎ असा विश्वास त्यांनी‎ व्यक्त‎ केला.

गल्लीतील‎ मुलगी आज‎ दिल्लीत‎ पोहोचली आहे सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाच्या‎ वेदना‎ व प्रश्नांची मला जाणीव आहे. सर्वांना‎ सोबत घेऊन‎ विकासासाठी अहोरात्र‎ काम‎ करणार,” अशी‎ भावनिक ग्वाही‎ खासदार ज्योतीताई‎ वाघमारे‎ यांनी‎ दिली‎ तसेच ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराचे‎ मार्गदर्शक‎ लक्ष्मण‎ मामा‎ जाधव यांच्या‎ सामाजिक कार्याचे‎ त्यांनी‎ कौतुक केले.

या‎ प्रसंगी नगरसेवक‎ प्रियदर्शन साठे,‎ शिवसेना नेते‎ मनीष काळजे,‎ नगरसेवक दत्तात्रय नडगिरी,‎ नगरसेविका‎ सौ.चैत्राली‎ शिवराज गायकवाड,‎ नगरसेविका‎ सौ.‎ कल्पना संतोष कदम,‎ सौ.‎ लक्ष्मी नडगिरी, ओम‎ साई‎ प्रतिष्ठानचे‎ शिवराज गायकवाड, कुमार जंगडेकर, हनुमंत सायबळु,‎ संतोष‎ कदम, श्रीराम जन्मोत्सव समितीचे‎ सुधीर बहिरवाडे,‎ अर्जुन‎ साळवे, सचिन जाधव,‎ निलेश‎ कांबळे,‎ सचिन‎ गुत्तेदार, हरीश तेलगू,‎ व्यंकटेश जाधव (दुर्गा),‎ धनराज‎ संधोळकर, प्रथमेश गायकवाड,तेजस‎ गायकवाड,अजिंक्य जाधव,करण‎ जाधव,‎ कार्तिक जाधव, श्रीकांत‎ गिडे,‎ संतोष ऋतिक‎ गायकवाड,‎ राम पल्ली मिस्त्री, महादेव‎ राठोड,‎ माणिक‎ कांबळे, वसंत‎ कांबळे,‎ फिरोज पठाण,‎ यल्लाप्पा‎ शिवापूरकर, हनुमंत‎ माडेकर,‎ युवराज जाधव,‎ संजय‎ भंडगे,सोनू‎ तळभंडारे‎ यांच्यासह‎ ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराचे सदस्य‎ मोठ्या‎ संख्येने‎ उपस्थित होते.‎