अखिल भारतीय सफाई मजदुर युनियन सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने धरणे आंदोलन

अखिल भारतीय सफाई मजदुर युनियन सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने धरणे आंदोलन

सोलापूर-: अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कामगारांचे विविध मागण्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचे ठरवले होते.
यास्तव सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आज सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी सकाळी 11 वाजता पुनम गेट, जिल्हा परिषद चौक,सोलापूर येथे अखिल भारतीय सफाई मजूर युनियन सोलापूर शहर व जिल्हा शाखा च्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रथमतः विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुष्पहार पण करून धरणे आंदोलन सुरुवात करण्यात आली.
उपस्थित कामगारांच्या वतीने कामगार एकजुटीचा विजय असो, सफाई कामगारांचे मागण्या सरकार मान्य केले पाहिजे असे विविध घोषणा देत एकदिवसीय धरणे आंदोलनात सुरुवात केली .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रलंबित मागण्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.
पुढील प्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या आहेत….
1) महाराष्ट्र राज्यात 1 लाख सफाई कर्मचारी नवीन नोकर भरती करण्यात यावी.
2)खाजगीकरण सफाई कामगार पूर्णतः बंद करण्यात यावे.
3) ठेकेदारावरी वर्षानुवर्षे सफाईचे काम करणाऱ्या सेवकांना कायम करण्यात यावे.
4) लाड व पागे कमिटीची अंमलबजावणी काटेकोरपणे पद्धतीने करण्यात यावी.
5)मॅन्युअल स्कॅजिंग पूर्णपणे बंद करण्यात यावे.
6) महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.
7)सफाई कर्मचारी स्वतंत्र वेल्पेअर बोर्ड माथाडी बोर्डच्या धर्तीवर स्थापन करण्यात यावे.
8)नगरपालिका /नगरपंचायत सफाई कामकारांचा समायोजन करण्यात यावा.
9)मा. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आरक्षणाचे वर्गीकरण मेहतर,वाल्मिकी, सुदर्शन, रुखी, मादिगा या समाजासाठी आरक्षण करण्यास यावे.
10) राज्यस्तरीय मॅन्युअल स्कॅजिंग समितीची स्थापना करून त्यावर मेहतर समाजाच्या कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी प्रतिनिधी देण्यात यावे.
11)डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना सक्तीने लागू करण्यात यावे.
12) राज्यात मेहतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत 1 लाख घरे बांधून देण्यात यावे.
13)केंद्र शासनाप्रमाणे 8 वेतन लागू करण्यात यावे.
14)जुने पेन्शन 2005 च्या नंतरचे सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे.
15)नगरपालिकेत /महानगरपालिकेत /ग्रामपंचायती मध्ये 2005 च्या नंतर जे सफाई कामगार म्हणून सेवेत लागले आहेत त्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या डी.सी.पी.एस. ची रक्कम कपात इत्यादी झालेली रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 4% व्याजासहित जमा करावी.
16)शासकीय निमशासकीय महानगरपालिका/ नगरपालिका/ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांची व व्यापगत झालेली पदे पुनर्जीवित करण्यात यावी.
17)मॅन्युअलच्या सफाई काम करतेवेळी मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसदारांना 50 लाख रुपये अनुदान व एक सरकारी कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
वरील सर्व अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन वतीने मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय येथे उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन शासन दरबारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पोहोचविण्यासाठी विनंती केले .
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपु, महाराष्ट्र राज्य कर्मचारी समन्वय समिती संघटक अशोक इंदापूरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शंतुनू गायकवाड, आरोग्य निरीक्षक संघटनेचे पदाधिकारी शशी सिरसट ,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दशरथ अड्डाकुल, सोलापूर शहर अध्यक्ष अरुण स्वाके, शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास रामगल, शहर सचिव व्यंकटेश देवनलू,सहसचिव श्रीनिवास मंदोलू, उपाध्यक्ष तिरुपती बोनसे, उपाध्यक्ष अशिष धुंबड,उपाध्यक्ष अमित सौदे, उपाध्यक्ष शाहरुख शेख, कन्हैया लालबेगी,सुभाष स्वाके, बाळु केशपागा,तुकाराम पेदोलू, नारायण अडाकुल, नर्सय्या चीनाकारम,नागेद्रम बेरकोलू, पांडुरंग रातोलू,सिद्राम भंडारी, कुर्मय्या मंदोलू, नागराज रातोलू, देविदास कोमोलू,कुमार सांगे, अमजद शेख, श्याम चव्हाण, महेश परमार, राजू कावल, कृष्णा केशपागा तसेच बहुसंख्य पुरुष व महिला कामगार उपस्थित होते.