राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ता व माध्यम समण्यक जिल्हापदी सुहास कदम, महायुतीत विनाकारण वाद निर्माण करनाऱ्यांणा घोटाळ्यासहीत उघडे करेन

राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ता व माध्यम समण्यक जिल्हापदी सुहास कदम, महायुतीत विनाकारण वाद निर्माण करनाऱ्यांणा घोटाळ्यासहीत उघडे करेन

सोलापूर – राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ता व माध्यम समण्यक जिल्हापदी सुहास कदम यांची निवड करण्यात आली. याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते.

अत्यंत कमी वेळात पक्षात चांगले काम केल्यामुळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्याचा उपाध्यक्ष पद देखील मला मिळाले, सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा सोलापूर शहराचा अध्यक्ष म्हणून नेतृत्व करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवेन, तसेच राज्यात महायुती सरकार कश्या पद्धतीने लोक हिताची, गोरगरीब कष्टकरी, विध्यार्थी, युवकांसाठी काम करून विकास करत आहे हे देखील मांडण्याचा काम करिन विरोधक लोकांना योग्य ते उत्तर देण्याचा मानस असल्याचे सुहास कदम यांनी सांगितले.

महायुती मधील काही लोक विनाकारण वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत त्यांना त्यांच्या घोटाळ्यासहीत उघडे करणे हा देखील माझा मुख्य उद्देश आहे. जिल्हापरिषद, महानगरपालिका, पंचायत समिती अश्या महत्वाचे निवडणूकित पक्षाचा शेतकरी, व्यापार, उद्योग, शिक्षण अश्या महत्त्वाचे विकासाचा अजेंडा जनतेसमोर मंडण्याचा माझे धोरण असणार आहे असे ही त्यांना सांगितले.