सोलापूर – महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्यावतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा व उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये राज्यभरातुन एकुन बावीस पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये उपक्रमशील शैक्षणिक संस्था माॅडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर,नवभारत ज्ञानवर्धीनी पुणे यांचा सन्मान केला व उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सांरंग पाटील,प्रभाकर ठाकरे,इरफान शेख,कृष्णपरमेश्वर सुतार,विद्या कांबळे यांना गौरविण्यात आले.
तर गुणवंत शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे,अंकुश सोहनी,किशोर देवरे,माधव माने,साहेराबानु मकानदार,शशिकांत नाब्दे,प्रशांत म्हेत्रे,बंडु मोरे,आफ्रिन शेख,मनोज केदार,नुतन गोलांडे,गीतांजली कोले यांना पुरस्कार देण्यात आले.
शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार बळवंत कटप यांना प्रदान केला गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनिता कांबळे व कविता शिवशरण यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हंटले शिक्षक हे आमच्यासाठी कायमच वंदनीय असणार आहेत अशा गुरुंना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सन्मान करण्याचे भाग्य आम्हांस लाभले त्याबद्दल आम्ही आपले कायमच ऋणी राहु महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम स्वरुपी शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्यासोबत राहील.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शिक्षकांना शुभेच्छा देताना भविष्यात मनसेचा शिक्षक आमदार राहील अशी ग्वाही दिली.
सदर प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,लोकसभाध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, जयवंत हक्के, सुधाकर तांबोळी यांनी मनोगतातुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोषकुमार घोडके तर सूत्रसंचालन गीतांजली कोले व आभार वीरसंगप्पा भोज यांनी मानले.
सदर प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे विश्वास गजभार,प्रकाश कोळी,मनोज सांळुंखे,सचिन पाटील,मंगल मुळीक,प्रभाकर कारंडे,म्हानुर सर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

