सोलापूर:- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तर नगरोथान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सोलापुर शहर उत्तर चे आमदार मा. विजय कुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून मा.गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर शहरातील हद्दवाढ भागासह इतर ठिकाणी ड्रेनेज टाकण्याकरिता शासनाकडे निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती त्यानुसार सन 2020 -24 च्या अंदाजपत्रकामध्ये 363 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता.
या अनुषंगाने बाळे परिसरातील वारद फार्म व ग्रीन अपार्टमेंट या भागातील नागरिकांनी या भागात ड्रेनेज लाईन व सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरत असलेबाबत तसेच विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व महिलांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण होता असले बाबत वारंवार सूचना केल्या होत्या. यानुसार मा. गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रदेश अध्यक्ष मा.सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, कृषिमंत्री यांच्या मार्गदर्शना नुसार संबंधित विभागास वारद फार्म ते ग्रीन्स अपार्टमेंट ते नाला परिसर या भागातील अडचण दूर करण्याबाबत पाठपुरावा केला.
या पाठपुराव्यानुसार आज प्रत्यक्ष ड्रेनेज लाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ या भागातील रहिवासी ,ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

या प्रसंगी भागातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना मा. गटनेते आनंद चंदनशिवे व मा.गणेश पुजारी यांचे आभार व्यक्त करून या भागातील ड्रेनेजची समस्या सोडविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

