अल्पसंख्यांकांचा‎ विश्वास अन्‎ कायमची‎ साथ-जन्नतुल फिरदोस‎ कब्रस्तान विकासातून‎‎ जाधव – गायकवाड यांचे नेतृत्व‎ अधोरेखित

अल्पसंख्यांकांचा‎ विश्वास अन्‎ कायमची‎ साथ-जन्नतुल फिरदोस‎ कब्रस्तान विकासातून‎‎ जाधव – गायकवाड यांचे नेतृत्व‎ अधोरेखित

सोलापूर‎ – अल्पसंख्यांक बहुल‎ भागातील‎ मूलभूत‎ नागरी‎ सुविधांना भक्कम बळ‎ देत सोलापूर महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ येथील जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तानसाठी‎ रस्ता काम व सुरक्षेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड उभारणीसाठी‎ प्रत्येकी‎ २५‎ लाख‎ रुपये, असा‎ एकूण ५०‎ लाख रुपयांचा निधी‎ सन २०२५–२६ अल्पसंख्यांक‎ बहुल‎ नागरिक‎ क्षेत्राकरिता‎ क्षेत्रविकास या‎ योजनेअंतर्गत‎ मंजूर‎ करण्यात आला‎ आहे.

हा‎ निधी‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे‎ राष्ट्रीय‎ अध्यक्ष‎ तथा‎ महाराष्ट्र‎ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित‎ पवार,‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस पार्टीचे प्रदेश‎ अध्यक्ष‎ तथा खासदार सुनील‎ तटकरे,‎ अल्पसंख्यांक‎ मंत्री नामदार माणिकराव कोकाटे आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीचे प्रदेश‎ सरचिटणीस, अल्पसंख्यांक‎ विभाग निरीक्षक,‎ ठाणे‎ महानगरपालिकेचे माजी गटनेते व अल्पसंख्यांक समाजाचे‎ ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला‎ यांच्या‎ मार्गदर्शनामुळे‎ व‎ निर्णायक भूमिकेमुळे प्राप्त‎ झाला‎ आहे.

प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक व‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे‎ प्रदेश उपाध्यक्ष‎ किसन‎ जाधव‎ तसेच‎ नगरसेवक‎ नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्यांक बांधवांना‎ दफनविधीच्या वेळी होणाऱ्या अडचणी,‎ पावसाळ्यातील‎ गैरसोय आणि कब्रस्तानच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न‎ सातत्याने शासनदरबारी‎ प्रभावीपणे मांडत‎ ठोस‎ पाठपुरावा केला होता. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित‎ पवार यांच्या‎ विशेष निधीतून जन्नतुल‎ फिरदोस‎ कब्रस्तान‎ येथे ५० लाखांचे सांस्कृतिक भवन मंजूर होऊन‎ त्याचे‎ भूमिपूजन नजीब मुल्ला यांच्या हस्ते पार पडले होते.‎ त्याच‎ भूमिपूजन‎ सोहळ्यात‎ किसन जाधव यांनी‎ रस्ता‎ व वॉल‎ कंपाऊंडसाठी ठाम मागणी‎ मांडली‎ होती.‎ त्या मागणीची दखल घेत नजीब मुल्ला यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांच्याकडे‎ शिफारस केली आणि‎ त्याचा थेट‎ परिणाम म्हणून‎ आज‎ हा निधी प्रत्यक्षात‎ मंजूर झाला आहे.

या‎ कामाचे अध्यादेशही‎ संबंधित विभागास प्राप्त झाले असून‎ लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.‎ गेल्या‎ तीन‎ वर्षांपासून‎ सोलापूर‎ महानगरपालिकेवर‎ प्रशासक‎ राजवट असतानाही किसन जाधव‎ व नागेश‎ गायकवाड‎ यांच्या इच्छाशक्तीमुळे, पाठपुराव्यामुळे आणि‎ कार्यक्षम‎ नेतृत्वामुळे‎ प्रभागातील विकासकामे मार्गी लागत असल्याचे स्पष्टपणे‎ दिसून‎ येत‎ आहे.‎ या‎ निधीमुळे‎ अल्पसंख्यांक‎ समाजात समाधान‎ व आनंदाचे वातावरण निर्माण‎ झाले‎ असून‎ समाज बांधवांनी किसन‎ जाधव व नागेश‎ गायकवाड‎ यांच्याविषयी‎ कृतज्ञता‎ व्यक्त‎ करत‎ पुढील काळात‎ सदैव त्यांच्या‎ पाठीशी खंबीरपणे‎ उभे राहण्याची‎ ग्वाही‎ दिली आहे.

यावेळी‎ अल्पसंख्यांक‎ समाज बांधवांनी‎ उपमुख्यमंत्री अजित‎ पवार, खासदार‎ सुनील तटकरे, अल्पसंख्यांक‎ मंत्री‎ माणिकराव‎ कोकाटे‎ आणि नजीब मुल्ला‎ यांचे‎ विशेष आभार‎ मानत,‎ त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच हा निधी मिळाल्याची भावना‎ व्यक्त केली. या पुढील‎ काळात प्रभाग 22 च्या सर्वांगीण विकासासाठी‎ जिल्ह्याचे संपर्क मंत्री‎ तथा‎ कृषी‎ मंत्री‎ दत्तात्रय‎ भरणे‎ आणि सह संपर्क‎ प्रमुख‎ तथा‎ विधानसभेचे‎ उपाध्यक्ष‎ अण्णा‎ बनसोडे यांच्या माध्यमातून विकास‎ साधणार‎ असल्याचेही यावेळी‎ किसन जाधव‎ म्हणाले.‎

अल्पसंख्यांक‎ समाजाचे प्रश्न‎ प्राधान्याने मार्गी‎ लावणारे नेतृत्व म्हणून‎ किसन‎ जाधव व नागेश गायकवाड‎ यांचा‎ गौरव‎ होत असून, हा विश्वास‎ व‎ पाठिंबा कायमस्वरूपी राहील, असा ठाम‎ विश्वास समाज बांधवांनी‎ व्यक्त‎ केला‎ आहे.‎ निश्चितच येणाऱ्या‎ काळात अल्पसंख्यांक समाजाच्या‎ विकासात‎ या‎ दोघांचे योगदान अधिक भरीव राहील,‎ असा‎ सूर‎ या निमित्ताने‎ सर्वत्र‎ उमटत आहे. या‎ पत्रकार‎ परिषदेस हाफिज सनामूल्ला,‎ तय्यब अली, आसिफ शेख,‎ महंमद आळगी,‎ असलम इनामदार,‎ महबूब‎ कुडले,‎ शहानवाज शेख,‎ सैपन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख,‎ फिरोज‎ पठाण‎ आदींची‎ उपस्थिती होती.‎