राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवावर महापालिकेत सत्ता मिळवू

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवावर महापालिकेत सत्ता मिळवू

सोलापूर – सोलापूरचे माजी महापौर प्रवीण डोंगरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविषयी आपली निष्ठा आजही कायम ठेवली असून त्यांच्या निष्ठेचा सामान्य कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा,असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी केले.शुक्रवारच्या दुसऱ्या दिवसाच्या सोलापूर दौऱ्यात अण्णा बनसोडे यांनी दुपारी कर्णिक नगरातील माजी महापौर प्रवीण डोंगरे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी डोंगरे यांनी अण्णा बनसोडे यांचा यथोचित सत्कार केला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोलापूर महानगरपालिकेत सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महापालिका निवडणुकीत कोणत्या पद्धतीने रणनीती आखायला पाहिजे याबाबतसुद्धा यावेळी चर्चा झाली.

अण्णा बनसोडे यांनी सुद्धा महापौर डोंगरे यांच्यासारख्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा अनुभव निवडणुकीला उपयोगी पडणार असल्याचे सांगत निश्चितच आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ७५ पार करेल,असा विश्वासही अण्णा बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर,माजी नगरसेविका नूतन गायकवाड, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अर्चना दुलंगे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, मान्यवर उपस्थित होते.