सोलापूर:- पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीला सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. या कारवाईत 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कार, मोटरसायकल, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 14,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
फिर्यादी यांना पैसे डबल करून देतो असे आमिष दाखवून 4 इसमांनी दि. 27/09/2026 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मोदी बोगदा, स्मशानभूमी जवळ, सार्वजनिक रस्त्यावर बोलावून घेतले. फिर्यादी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या इतर 3 साथीदारांनी स्वतः पोलीस असल्याचे सांगून फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडील 6,80,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. 822/2026 भा.न्या.सं. कलम 310(2), 204, 205, 115(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदारामुळे आरोपी जाळ्यात
सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. दि. 28.09.2026 रोजी पोह/416 हाजीमलंग शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे वांगी रोड, सोलापूर येथील मोकळ्या मैदानात चार इसम एक स्विफ्ट चारचाकी व एका दुचाकीवर वांगी रोड येथील मोकळ्या मैदानात संशयितरित्या थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
माहिती मिळताच सपोनि / डी.बी. काळे व त्यांच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि चारही जणांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे –
- संतोष राजाप्पा पाटील, वय- 44 वर्ष, रा. 9-10-65, संगमेश्वर निलाच्या मनोली रोड, रामपुरे कॉलनी, बिदर राज्य – कर्नाटक
- महिबूब युसूफ बिजापूरे रा. महिबूब सुभानी दर्गाजवळ, डोणगांव रोड, सोलापूर
- मल्लिकार्जुन यल्लप्पा शिवकळ्ळी, वय- 42 वर्ष, रा. राणीेबेन्नूर जि. हवेरी राज्य- कर्नाटक
- मंजुनाथ कल्याणराव निडोडे, वय- 35 वर्ष, रा. हंडरे रोड, भालकी, जि. बिदर राज्य- कर्नाटक
ताब्यात घेतल्यानंतर कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल –
आरोपींच्या ताब्यातून 01 स्विफ्ट कार, 01 मोटार सायकल, 05 मोबाईल फोन, रोख रक्कम रु. 5,50,000/- असा एकूण 14,34,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) श्री. दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. दत्तात्रय काळे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखणे, अभिजित पवार, निलोफर तांबोळी तसेच सायबर पोलीस ठाणे कडील मच्छिंद्र राठोड, चालक सतिश काटे व बाळासाहेब काळे यांनी केली आहे.
