पोलिसांच्या छाप्यात आढळलेल्या 30 लाख 96 हजारांचा मुद्देमाल केला नाश

पोलिसांच्या छाप्यात आढळलेल्या 30 लाख 96 हजारांचा मुद्देमाल केला नाश

सोलापूर – अवैध हातभट्टी निर्मीतीच्या ठिकाणी छापे टाकुन 30 लाख 96 हजारांच्या किमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त कारवाईमधील नाश करण्यात आला.

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत सुचना तसेच आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राहुल अत्राम (भा.पो.से.), परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांचेकडील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे दिनांक १२/०१/२०२५ रोजी मौजे मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी व प्रभावी कारवाई केली. 

सदर कारवाई दरम्यान मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चा माल गुळमिश्रीत रसायन, लोखंडी पिंपाच्या भट्टी तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण ३० लाख ९६ हजारांच्या किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्या अनुषंगाने अवैध हातभटी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याबाबत ०४ सराईत हातभट्टी व्यवसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणारयां विरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही व त्यांच्या विरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी ही अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभाग, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल अत्राम, भा.पो.से., विजय शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, कुलदिप सोनटक्के, पोलीस उप निरीक्षक, ग्र. पो. सई श्रीकांत गायकवाड, सपोफौ प्रकाश कारटकर, पो.हे.कॉ. विजय भरले, पो.हे.कॉ. रवि माने, पो.हे.कॉ. धनराज गायकवाड, पो. कॉ. सुरज रामगुडे, मनोज राठोड, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, ने. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांनी तसेच राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडील निरीक्षक घाडगे, निरीक्षक, चौरे, निरीक्षक पाटील, व श्री. सिध, शेळके व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्तरित्या कामगीरी केली आहे.