स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; जोमाने कामाला लागा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; जोमाने कामाला लागा

सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी केले.


अण्णा बनसोडे तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.गुरुवारी पहिल्या टप्प्यातील झंझावती दौरा रात्री उशिरा संपल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात महापुरुषांना अभिवादन आणि त्यानंतर सदिच्छा भेटी झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी दुपारी विडी घरकुल श्रीराम नगर येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुपेश भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर रुपेश भोसले तसेच नारायण माशाळकर यांनी प्रियदर्शनी नगरातील श्री हॉल येथे प्रभाग क्रमांक ९, १० आणि ११ ची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णा बनसोडे यांनी कोणत्याही परिस्थितीत सोलापूर महानगरपालिकेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यानंतर जुना तुळजापूर नाका येथील सोमनाथ शिंदे आणि घोंगडे वस्ती दत्त मंदिर येथील माजी नगरसेवक सिद्धेश्वर आनंदकर यांच्या निवासस्थानी अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.

आपण सोलापूर महानगरपालिकेत यापूर्वी काम केले असल्यामुळे आपल्या कामाचा अनुभव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निवडून आणण्यात महत्त्वाचा ठरेल,असा विश्वास सिद्धेश्वर आनंदकर यांचे नाव घेत अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटीत अण्णा बनसोडे यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. तसेच महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
तत्पूर्वी खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर यांनी जुना तुळजापूर नाका येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे जंगी स्वागत केले.तसेच ५१ फूट श्री हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.आणि या देखण्या व भव्य हनुमान मूर्तीचे तोंड भरून कौतुक केले.


यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर ,युवक कार्याध्यक्ष तुषार,संघटक दत्तात्रय बडगंची,जक्का ,माजी नगरसेविका नूतन गायकवाड, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे , राज बिटला, यांची उपस्थिती होती.