केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वार्थाने विकासाभिमुख आहे. या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेला मुंबई – पुणे आणि पुणे – हैदराबाद या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे सोलापूरच्या विकासालाही मोठी गती मिळणार आहे. सोलापूरात आयटी पार्कची उभारणी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने सोलापूरला दिलेला हा बूस्टर डोस सोलापूरच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणार आहे. विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासास चालना देणारा निर्णय ठरणार आहे. केंद्र सरकार वस्त्रोद्योगाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा प्रत्यय या अर्थसंकल्पातून येत आहे. या अर्थसंकल्पामुळे हँडलूम, खादी, हातमाग व्यवसायाला दिलासा मिळाला आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना करात सवलत जाहीर झाल्यामुळे उच्च शिक्षण घेण्यास केंद्र सरकार चालना देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. एकूणच विकसित भारताची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Posted inPolitics
