सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. “शत : प्रतिशत भाजपचा नारा” या निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग ६ मधील भाजप उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी ९ वाजता देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून होणार असल्याची माहिती, प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनी दिली.
याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख,सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर उपस्थित राहणार आहेत.
प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर त्याच ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रभाग क्रमांक ६ मधील जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भारतीय जनता पार्टीकडून सोनाली अर्जुन गायकवाड, सुनील पांडुरंग खटके, मृण्मयी महादेव गवळी आणि गणेश प्रकाश वानकर निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मधील रविवारच्या प्रचाराच्या शुभारंभानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला मोठ्या दणक्यात व जोमाने सुरुवात होणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत.
सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. पुन्हा एकदा या निवडणुकीतसुद्धा “अब की बार ७५ पार ” चा नारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मधून भारतीय जनता पार्टीचे सर्व चार नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रभागातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी जोर लावला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा मधील निवडणुकीकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सकाळी ९ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रभागातील जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

