प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजप‎ उमेदवारांच्या पदयात्रेला‎ मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजप‎ उमेदवारांच्या पदयात्रेला‎ मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर‎ : महानगरपालिका‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर‎ प्रभाग क्रमांक‎ २२ मधील भारतीय‎ जनता पार्टीचे अधिकृत‎ उमेदवार‎ किसन‎ जाधव, दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ. अंबिका नागेश‎ गायकवाड‎ आणि‎ सौ. चैत्राली‎ शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला नागरिकांकडून‎ प्रतिसाद मिळत‎ असल्याचे‎ चित्र‎ दिसून येत‎ आहे. मंगळवारी‎ सेटलमेंट‎ परिसरात पदयात्रा‎ व मतदार‎ संवाद कार्यक्रमाचे‎ आयोजन‎ करण्यात आले‎ होते.

ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे आधारस्तंभ‎ व‎ मार्गदर्शक लक्ष्मण‎ जाधव‎ तसेच प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे‎ माजी‎ नगरसेवक‎ नागेश गायकवाड यांच्या‎ मार्गदर्शनाखाली‎ ही पदयात्रा पार पडली. यावेळी‎ लिमयेवाडी,‎ कावळा‎ गल्ली,‎ मंजुनाथ‎ नगर, सनत‎ नगर‎ आदी भागांमध्ये‎ नागरिकांच्या गाठीभेटी‎ घेत त्यांच्या‎ समस्या,‎ सूचना‎ व अपेक्षा जाणून‎ घेण्यात‎ आल्या.

प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार‎ गोरे,‎ आमदार‎ विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष‎ देशमुख‎ आणि‎ आमदार देवेंद्र कोठे‎ यांच्या‎ माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या विकासकामांची‎ माहिती मतदारांशी संवादातून‎ देण्यात आली.‎ रस्ते, पाणीपुरवठा,‎ ड्रेनेज, वीज,‎ आरोग्य, स्वच्छता आणि‎ पर्यावरण‎ विषयक‎ कामांना‎ पुढील‎ काळात‎ प्राधान्य दिले जाईल, असे‎ उमेदवारांनी‎ सांगितले.‎ पदयात्रेदरम्यान नागरिकांनी‎ स्थानिक‎ प्रश्न‎ मांडत भविष्यातील विकासाबाबत अपेक्षा व्यक्त‎ केल्या.‎