कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

सोलापूर – महाराष्ट्रातील संत परंपरा ही विचार व ज्ञानाची शिदोरी आहे. ते संतांचे अभंग भजनाच्या माध्यमातून समाज मनात रुजवणे ही एक कला आहे. अशा अनेक लोककलांना चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाकडून कलाकार मानधान योजना सुरु केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी खूप आहेत. म्हणून भाविक वारकरी मंडळ प्रयत्न करत आहे. या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आशिष शेलार ( सांस्कृतिक मंत्री ) लेखी निवेदन देऊन मागणी केली व चर्चा ही केली आहे. त्यामध्ये कलाकार मानधान अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा असा नियम केला असून तो नियम कलाकारांना त्रासदायक आहे. कारण ग्रामीण भागातील कलाकारांना हे शक्यच होत नाही. त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र पीडीएफ करणे, त्यामध्ये 15 वर्षा पूर्वीपासून कलाकार असलेला पुरावा. कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रम फोटो, नोंदणी कृत संस्था शिफारस पत्र, प्रमाण पत्र, रहिवाशी दाखला, वयाचा दाखला, रहिवाशी दाखला म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि रेशन कार्ड ग्राह्य धरावे, इ. अनेक कागदपत्र आवश्यक आहेत. त्यामुळे ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज घ्यावेत.

10 वर्षा पूर्वीचा पुरावा ग्राह्य धरावा. ऑनलाईन लिंक फक्त जुलै एक महिनाच असते. ती वर्षभर असावी व तपासणी कालावधीसाठी काल मर्यादा निश्चित करावी. अशा अनेक मागणीचे निवेदन देण्यात आल्यामुळे त्यासंबंधी मंत्रालयात दि. 12 नोव्हेंबर ला दु. 2.00 वा. बैठक लावण्यात आली होती. अधिकारी व आपण प्रत्यक्ष चर्चा करून हे सर्व विषय मार्गी लावू असे आशिष शेलार म्हणाले होते म्हणून बैठक लावली होती . परंतु ही सध्या बैठक पुढे गेली आहे, असे संस्कृतीक विभागाकडून इंगळे महाराज यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.