सोलापूर – दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ सोलापूर वरून पुणे येथे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या व्हॅगनार कार क्रमांक MH 12 XQ 8753 चे पुढील टायर फुटल्याने कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन बेंगलोर वरून मुंबई येथे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात कारचालकाच्या बाजूला बसलेल्या एका महिलेच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाली तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाले.
सदर अपघात जखमी झालेल्या व्यक्तींना शेटफळ ग्रामीण रुग्णालयातील १०८ या शासकीय रुग्णवाहिकेमधून डॉ.प्रदिप पाटील आणि रुग्णवाहिका चालक सिद्धेश्वर राऊत यांनी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक , रुग्णवाहिकापथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश पवार (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या अपघातातील वाहने वरवेड टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव सौ . रत्ना राजेंद्र परमाणी वय ६५ वर्षे, रा. पुणे महाराष्ट्र असे आहे, सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी षीरसागर साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री.विजय साळुंखे यांनी दिली आहे.

