सोलापूर महिला संघ उपांत्य फेरीत; आर्या उमापचे नाबाद 102 धावा

सोलापूर महिला संघ उपांत्य फेरीत; आर्या उमापचे नाबाद 102 धावा

सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सुरू असलेल्या निवड सामन्यात सोलापूर संघाने आज कोल्हापूर संघाचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.


कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करत 47 षटकात 142 धावा केल्या. सोलापूर संघाकडून पुनम माशाळे 2, विभावरी देवकते 2, भक्ती पवार 1, अमृता गव्हाणे 1, स्नेहा शिंदे 1,आर्या उमाप 1असे गडी बाद केले. 142 धावांचा पाठलाग करत असताना सोलापूर संघाकडून आर्या उमाप हिने नाबाद 102 धावा करीत एकहाती हा सामना जिंकून दिला. सोमवारी सोलापूर संघ पुणे संघाशी उपांत्य सामना खेळेल.


सोलापूर संघाचे स्नेहल जाधव, किरण मणियार, सारिका कुरुलकर, मानसी जाधव – कदम यांनी अभिनंदन केले.


तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष- दिलीप माने, चेअरमन- रणजित सिंह मोहिते पाटील, व्हा. चेअरमन- श्रीकांत मोरे, तसेच उपाध्यक्ष- प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख व संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सु सर व कार्यकरणी सदस्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.