सोलापूर – मध्य रेल्वेने सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सोलापूर रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली.
ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २४ नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. दौंड येथे सकाळी ०८:०८ वाजता आगमन होईल तर सकाळी ०८:१० वाजता प्रस्थान होईल.
ट्रेन क्रमांक २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस २४ नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. दौंड येथे रात्री ०८:१३ वाजता आगमन होईल तर रात्री ०८:१५ वाजता प्रस्थान होईल. रचनेमध्ये आणि इतर थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी प्रवाशांना नवीन थांबा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

