विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर – सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे आर बी दयावान संस्थेच्या वतीने अनेक आंदोलने, निदर्शने, आमरण उपोषण, अन्यायाविरुद्ध लढा उभा करणारे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवूरे, कोणतेही पद प्रतिष्ठा नसताना आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडून कोट्यावधी निधी खेचून आणून प्रभागाचा विकास करणारे विश्वभूषण कांबळे यांची सामाजिक कार्याबरोबर राजकीय पार्श्वभूमी स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभाचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रक्ष प्रवेश करताच प्रभाग क्रमांक चार अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली.

विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांना भेटून दाट लोकवस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये अनेक विकास कामे रखडले आहेत. निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले.

यावेळी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड,प्रमोद भोसले, श्रीनिवास कोंडी, प्रकाश जाधव, सुरेखा घाडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते.