शेख महापालिका निवडणुकीत आयकॉन ठरतील – अण्णा बनसोडे

शेख महापालिका निवडणुकीत आयकॉन ठरतील – अण्णा बनसोडे

सोलापूर – शांत आणि संयमी शेख अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आयकॉन ठरतील, असा विश्वास विधानसभेचे उपसभापती आणि सोलापूरचे अजित दादा पवार राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री यांना बनसोडे यांनी व्यक्त केला.


शुक्रवारी दुसऱ्या दिवशीचा दौरा संपताना सायंकाळी उशीरा अण्णा बनसोडे यांनी सिव्हिल चौकातील शेख यांच्या निवासस्थानी भेट दिली. शेख परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.


सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू, असे अभिवचन शेख त्यांनी यावेळी अण्णा बनसोडे यांना दिले.


यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव , माजी परिवहन आनंद मुस्तारे महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, श्यामराव गांगर्डे शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख प्रियंका पवार रोहित माने आदी मान्यवर उपस्थित होते.