सोलापूर – संविधान दिनाचे औचित्य साधून मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29, भवानी पेठ, सोलापूर येथे विद्यार्थी मुख्यमंत्री निवडणूक 2025 हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख, मतदानाचे महत्त्व, नेतृत्वगुण आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या शाळेत उमेदवारांची निवड, प्रचार प्रक्रिया आणि मतदानपूर्व Mock Poll (सराव मतदान) पूर्ण झाले असून, मुख्य मतदान प्रक्रिया दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत पार पडणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी EVM SIMULATOR हे अॅप वापरण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी एक प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29 तर्फे सोलापूरमधील सर्व शाळांना विशेष आवाहन करण्यात येत आहे की —
“संविधान दिनानिमित्त आपल्या शाळेतही लोकशाहीवर आधारित निवडणूक उपक्रम राबवा.”
अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये
✔ नेतृत्वगुण
✔ जबाबदारीची भावना
✔ मतदानाचे महत्त्व
✔ संविधानाविषयी अभिमान
या मूल्यांची जडणघडण करण्यास विशेष उपयुक्त ठरतात.
मतदान, मतमोजणी व शपथविधी कार्यक्रमाच्या सविस्तर बातमी मतदानानंतर प्रसिद्ध केली जाईल. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात येत आहे.

