महाशिवरात्री निमित्त जेमीनी सांस्कृतिक मंडळात रुद्राभिषेक व महाआरती

महाशिवरात्री निमित्त जेमीनी सांस्कृतिक मंडळात रुद्राभिषेक व महाआरती

सोलापूर – हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक पर्व असलेल्या महा शिवरात्री निमित्त जेमीनी सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्था मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने पूजा, रुद्राभिषेक व महाआरती कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी सात वाजता मंडळाचे चालू अध्यक्ष प्रवीण डोळ्ळे सपत्नीक तसेच सौ. सपनाताई महेश मलूरे आणि परिसरातील सर्व माता-भगिनी व बांधवांच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजा-अर्चना करण्यात आली.


भगवान शिवाच्या नामस्मरणाने परिसर शिवमय झाला होता. मंत्रोच्चार, बेलपत्र अर्पण आणि दुग्धाभिषेकाने वातावरणात अध्यात्मिक ऊर्जा संचारली. त्यानंतर जेमिनी मातेची महाआरती विजय दादा साळुंखे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडली. आरतीवेळी “हर हर महादेव” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या कार्यक्रमासाठी मंडळाचे आधारस्तंभ माजी सभागृह नेते श्री. सुरेश आण्णा पाटील, बसवराज जाटगल, नरसप्पा मंदकल, विजय पुजारी, आनंद सिंगराल, सायबण्णा मोडल, गंगाराम डोळे, बसवराज करली, विनायक पाटील, यशवंत पुराणिक, व्यंकटेश जाटगल, प्रविण कैरमकोंडा, सिद्राम शेखशिंदी, जबंण्णा होसमणी, सिद्राम मंदकल, विजय कोळी, राहूल संकाराम मलई, कुमार शिरसगीकर, संतोष कोळी, नागेश डोळे, अक्षय पाटील, महेश शिंदे, प्रकाश पुजारी, लक्ष्मण पुजारी, अंबादास कडगुडा, दिनेश पाटील आदींसह सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती, एकोप्याची भावना आणि सामाजिक एकजुटीचा सुंदर संगम साधत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.