प्रभाग ०४ मधील जनतेशी आ. विजय देशमुखांचा जनसंवाद

प्रभाग ०४ मधील जनतेशी आ. विजय देशमुखांचा जनसंवाद

सोलापूर – शहर उत्तर मंगळवार पेठेतील श्री. र. ह. अट्टल माहेश्वरी भवन येथे भाजपा प्रभाग ०४ वतीने आयोजित केलेल्या “जनसंवाद” बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जनसंवाद बैठकीच्या प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतमातेच्या प्रतिमेस आमदार विजय देशमुखांच्या हस्ते पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

प्रभाग ०४ येथील जनसंवाद बैठकीत आमदार विजय देशमुख यांनी जनसंवाद बैठकीत जनतेशी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकूण व समजून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासित केले. सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील यापुढेही प्रत्येक प्रभागात दर ०२ महिन्यांनी थेट जनतेशी जनसंवाद साधून त्यांचे प्रश्न निकाली लावणार आहे असे आमदार विजय देशमुख यांनी बोलले.

यावेळी मा. नगरसेवक अनंत जाधव, मा. नगरसेवक विनायक विटकर, मा. नगरसेविका वंदना गायकवाड, मा. नगरसेविका सुरेखा काकडे, महेश तापडिया, देविदास चेळेकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, भाजयुमो प्रदेश सचिव गणेश साखरे, गौतम कसबे, माजी मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, मनोज मलकुनाईक, श्रीकांत कट्टीमनी, गोपाळ झंवर, बाळू दरक, शिवराज पवार आदी उपस्थित होते.


जनसंवाद बैठकीचे प्रस्ताविक अनंत जाधव, सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी व आभार प्रदर्शन विनायक विटकर यांनी मानले.

जनसंवाद बैठकीस प्रभागातील सर्वच भागातील नागरिक, व्यापारी, डॉक्टर, विधीज्ञ आदींसह प्रभाग ०४ मधील भाजपा पदाधिकारी व समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आमदारांनी आमच्याशी थेट भेटीगाटीत, थेट संवाद साधल्याने आम्ही समाधानी आहोत.

आमदार विजय देशमुख यांच्या निरंतर विकासकार्याने आमच्या भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. त्यांचे नगरसेवकही आमच्या दैनंदिन येणाऱ्या अडचणी नित्य सोडवितात यावर आम्ही समाधानी आहोत. प्रभाग ०४ मध्ये सोलापूर शहराची प्रमुख कापड मार्केट, सराफ मार्केट, भुसार मार्केटसह प्रमुख जुनी बाजारपेठ असल्याने इथे स्वतंत्र वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था नसल्याने इथे नेहमीच ट्रॅफिक जाम होत असल्याने येथील बाजारपेठेवर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे आम्हांला बाजारपेठ लगत सोयिस्कर अद्ययावत असे वाहनतळ उपलब्ध करून दिले तर आमची कायमची ट्रॅफिक समस्या संपेल.


वाहनतळ बाबत (पार्किंग) लवकरच मनपा व वाहतूक अधिकारीसोबत बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावू असे आमदार विजय देशमुख यांनी बोलले. थेट जनसंवादातून आमच्या समस्या ऐकून व समजून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे सांगितल्याने आम्ही नागरिकांच्या वतीने आमदार विजय देशमुख व विद्यमान नगरसेवक अन् आयोजकांचे आभार मानतो.
शिवानंद सावळगी, नागरिक प्रभाग ०४