सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि गावात स्मशानभूमीची जागा असूनही दुरावस्था आहे त्यामुळे तात्काळ शासनाच्या वतीने किंवा जेवला नियोजन समितीच्या मार्फत तात्काळ निधीची उपलब्ध करून द्यावी अन्यथा पालक मंत्र ्याच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तिरडी आंदोलन काढू असा इशारा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे या आशियाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिले आहे तसेच माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांना याबाबत ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी स्मशानभूमी साठी जागा असून देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व शासनाचा निधी स्मशानभूमीच्या सुख सुविधा साठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शासन ग्रामीण भागात सुख सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दर्शवत आहेत पण ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमी ची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे नागरिकांना मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याकारणाने रात्री बे रात्री कोणाच्या तरी शेतामध्ये कुठल्यातरी मोकळ्या जागेत अंत्यविधी करावे लागत आहे.
ही प्रगत महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह बाब नाही. जिल्हय़ातील अनेक ग्रामीण भागांमध्ये स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तिथे पिण्याचे पाण्याची सोय नाही बसण्यासाठी कठडे नाहीत काही ठिकाणी लाईटची सुविधा नाही निवारा शेड संरक्षण भिंत व कसल्याही अन्य सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी आपण डीपीडीसी मधून तात्काळ मोठ्या प्रमाणात सर्व सुख सोयीसह अद्यावत स्मशानभूमी उभी करण्यासाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीच्या वेळी तिरडी आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा कार्याध्यक्ष रमेश चव्हाण शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे इस्माईल मकानदार रवी चव्हाण पिंटू कोरे ईकरार शेख पत्रकार बालाजी वाघे गजानन शिंदे महेश भंडारे आदी उपस्थित होते

