सोलापूर – माजी महापौर स्व. महेश कोठे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी रात्री प्रवेश केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला.
माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे, राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार, संतोष सोमा, आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला.

