ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या वतीनं सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांचा सन्मान

ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या वतीनं सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांचा सन्मान

सोलापूर‎ : ईच्छा‎ भगवंताची परिवाराच्या‎ वतीने भाजपा नगरसेवक किसन जाधव यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता प्रशाला समोरील‎ संपर्क‎ कार्यालयात‎ नूतन स्वीकृत‎ नगरसेवक तसेच‎ स्थायी‎ समिती‎ सदस्यांचा‎ भव्य सत्कार सोहळा उत्साहात‎ पार‎ पडला.‎

शाल,‎ भगवा‎ फेटा,‎ वृक्ष‎ आणि‎ स्वामी विवेकानंद यांच्या‎ जीवन‎ चरित्रावरील‎ पुस्तक भेट‎ देऊन मान्यवरांचा‎ गौरव करण्यात आला‎ या कार्यक्रमास‎ महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी‎ देवकर यांच्यासह‎ माजी महिला व‎ बालकल्याण समिती‎ सभापती,‎ अश्विनी चव्हाण, संगीता‎ जाधव, स्वीकृत‎ नगरसेविका वृषाली चालुक्य, देवकर मावशी, बिजू प्रधाने, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, शिवाजी‎ वाघमोडे, सतीश‎ शिरसिल्ला, भरतसिंग बडूरवाले,‎ अक्षय अंजिखाने, श्रीनिवास दायमा,‎ ज्ञानेश्वर म्याकल, अँड. ऋषिकेश मेट्रे,‎ रुद्रेश‎ बोरामणी,‎ विठ्ठल‎ मेट्रे‎ आदी उपस्थित‎ होते.

यावेळी किसन जाधव,‎ नगरसेवक दत्तात्रय नडगिरी, माजी‎ परिवहन‎ समिती सदस्य संतोष कदम, युवा‎ नेते‎ चेतन नागेश‎ आण्णा गायकवाड, महेश देवकर,‎ वृक्षमित्र‎ मनोज‎ देवकर,‎ निलेश‎ कांबळे,‎ अरविंद‎ शेरखाने,‎ संतोष गायकवाड‎ (हुडको), अमोल‎ जगताप,‎ रामभाऊ मिस्त्री, किरण शिंदे, हुलगप्पा शासम, उत्कर्ष‎ गायकवाड,‎ यल्लाप्पा‎ शिवापुरी,‎ प्रथमेश‎ पवार, ऋषी येवले, बिराजदार मावशी, शोभा गायकवाड,‎ मारता‎ असादे, प्रमिला स्वामी, शहाजान‎ शेख, फिरोज पठाण‎ आदींची‎ उपस्थिती‎ लक्षणीय‎ ठरली.

सत्कारास‎ उत्तर‎ देताना‎ महापौर विनायक कोंड्याल यांनी‎ सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी‎ सर्व‎ घटकांना‎ सोबत‎ घेऊन‎ पारदर्शक व‎ विकासाभिमुख‎ काम करू, अशी ग्वाही‎ दिली. शहरातील‎ मूलभूत सुविधा,‎ स्वच्छता,‎ पायाभूत‎ विकास आणि‎ जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष‎ केंद्रित‎ केले जाईल, असे मनोगत‎ उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी‎ देवकर‎ यांनी‎ व्यक्त‎ केले‎.

यावेळी‎ उपस्थित नूतन सदस्यांना किसन जाधव‎ यांनी‎ शुभेच्छा दिल्या. या‎ कार्यक्रमामुळे‎ सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांना एकत्र आणण्याचा‎ संदेश देत‎ शहरात‎ सकारात्मक‎ राजकीय‎ वातावरण निर्माण‎ झाल्याचे‎ चित्र‎ दिसून‎ आले.