सोलापूर : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तर्फे आयोजित “युनिटी NPL 20” या क्रीडा महोत्सवाला जय जवान जय किसान शाळा, विजयपूर रोड येथे रविवारी (७ डिसेंबर) उत्साहपूर्ण सुरुवात झाली. क्रिकेटसह विविध खेळांचा समावेश असलेल्या या भव्य क्रीडा उपक्रमाचे उद्घाटन युनिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. रवी चव्हाण व निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉ. उत्कर्ष वैद्य यांनी दिली.
दरवर्षी आयोजित होणारी NPL स्पर्धा डॉक्टरांसाठी फिटनेस आणि आनंदाचा अनोखा संगम मानली जाते. दिवसरात्र रुग्णसेवेत व्यग्र असलेल्या डॉक्टरांना खेळांद्वारे तंदुरुस्तीचा मंत्र देणारा हा उपक्रम यंदा २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरातील सर्व पॅथींचे डॉक्टर मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवत असल्याने या स्पर्धेला वैद्यकीय क्षेत्रात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

उद्घाटन सोहळ्यात मुख्य प्रायोजक युनिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर बिराजदार यांच्यासह सर्व संचालक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध टीम ओनर्स—डॉ. कांबळे, डॉ. भोगे, डॉ. भुतडा, डॉ. पिलगुलवार, डॉ. शेवाळे, टेस्ला डायग्नोस्टिक, डॉ. अहिरसंग, डॉ. कोठे, डॉ. राठोड, डॉ. पैके, डॉ. चव्हाण, डॉ. बंग, डॉ. मोरे, डॉ. पेंडॉर—यांचाही गौरव करण्यात आला.
NPL 20 यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, सचिव डॉ. रोहित शेळवणे, कोषाध्यक्ष डॉ. योगेश उडगीकर यांच्यासह डॉ. धप्पाधुळे, डॉ. माशाळकर, डॉ. स्वामी, डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. बियाणी, डॉ. बगले, डॉ. गाजुल, डॉ. सिंदगी, डॉ. अश्विनी देगावकर यांनी महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, सचिव डॉ. अभिजीत पुजारी, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे, स्टुडन्ट फोरमचे डॉ. समर्थ वाले, रोहन चौगुले, वूमन फोरम अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, तसेच डॉ. रवि गायकवाड, डॉ. पांढरे, डॉ. तात्यासाहेब देशमुख, डॉ. धीमधीमे, डॉ. राजश्री मठ इ. मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन NPL चे प्रणेते डॉ. नितीन बलदवा यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. किरण देशमुख यांनी मानले.

