नूतन‎ जिल्हा परिषद सदस्या‎ संस्कृती राम सातपुते यांचा‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीनं‎ सत्कार

नूतन‎ जिल्हा परिषद सदस्या‎ संस्कृती राम सातपुते यांचा‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीनं‎ सत्कार

माळशिरस – तालुक्यातील‎ दहीगाव जिल्हा परिषद‎ सदस्यपदी‎ माजी आमदार रामभाऊ‎ सातपुते‎ यांच्या‎ धर्मपत्नी‎ सौ. संस्कृतीताई‎ रामभाऊ सातपुते यांची बहुमताने निवड‎ झाल्याबद्दल माळशिरस‎ येथील श्री राम‎ निवास येथे‎ ‘ईच्छा भगवंताची मित्रपरिवार’च्या‎ वतीने‎ त्यांचा उत्स्फूर्त‎ सत्कार करण्यात आला. विजयाबद्दल‎ आनंद‎ व्यक्त‎ करत कार्यकर्त्यांनी‎ त्यांना पुढील‎ कार्यकाळासाठी‎ शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी‎ सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे भाजप‎ नगरसेवक‎ किसन जाधव, युवा नेते चेतन नागेश गायकवाड, उमेश जाधव, शरदराव शिंदे, माणिक‎ कांबळे, यल्लप्पा‎ शहापूरे तसेच‎ मित्रपरिवारातील‎ पदाधिकारी‎ व‎ कार्यकर्ते‎ मोठ्या संख्येने उपस्थित‎ होते. सर्वांनी‎ पुष्पगुच्छ देत आणि‎ घोषणाबाजी‎ करत विजयाचा‎ आनंद साजरा‎ केला.‎

यावेळी‎ माजी‎ आमदार‎ राम‎ सातपुते यांचाही‎ विशेष सन्मान‎ करण्यात‎ आला.‎ किसन भाऊ‎ जाधव‎ यांच्या हस्ते त्यांना टोपी,‎ शाल‎ आणि‎ पुष्पगुच्छ देऊन‎ गौरविण्यात‎ आले.‎ कार्यकर्त्यांच्या‎ उत्साहपूर्ण‎ वातावरणात झालेल्या या‎ सत्कार समारंभात सातपुते कुटुंबीयांविषयी अभिमान‎ आणि‎ विश्वास‎ व्यक्त‎ करण्यात आला.

सौ. संस्कृतीताई‎ सातपुते‎ यांनी मतदारांचे आभार‎ मानत दहीगाव परिसराच्या‎ विकासासाठी‎ प्राधान्याने काम‎ करण्याचा निर्धार‎ व्यक्त केला.‎ या विजयामुळे परिसरातील‎ राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण‎ झाले‎ असून‎ कार्यकर्त्यांमध्ये‎ उत्साहाचे‎ वातावरण पाहायला‎ मिळत‎ आहे.‎