रोजंदारी कामगारांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देण्याचा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचा शब्द !

रोजंदारी कामगारांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देण्याचा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचा शब्द !

सोलापुर – रोजंदारी कामगारांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी दिली . गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात गौतम नागटिळक आणि संग्राम आखाडे यांनी रोजंदारी कामगारांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अण्णा बनसोडे यांनी रोजंदारी कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे रोजंदारी कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने रोजंदारी कामगार उपस्थित होते.


यावेळी सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख,प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,सचिव इरफान शेख,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, नजीब शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी, सुहास कदम यांची उपस्थिती होती.